उल्लू

0
ullu

उल्लू हा शब्द वेगवेगळ्या प्रकारे उपयोगात आणला जातो. ‘उगाच उल्लूपणा करू नकोस, जरा नीट विचार करून काम करत जा.’, ‘त्यांचा मुलगा अगदीच उल्लू निघाला हो, काहीच कामाचा नाही! म्हातारपणी त्यांनाच त्याला पोसावे लागत आहे!’, ‘तो रात्र-रात्र बाहेर असतो! उल्लू लेकाचा!! त्या शब्दाचा अर्थ विचार न करता कसेही वागणारा, बिनकामाचा, उडाणटप्पू असा काहीसा आहे. ‘उल्लू’ हा शब्द ‘उलूक या संस्कृत शब्दाचे मराठी रूपांतर आहे. उलुक म्हणजे घुबड. घुबड हा पक्षी इतर पक्ष्यांप्रमाणे दिवसा वावरत नाही, तो त्याचे भक्ष्य शोधत रात्री फिरतो! त्याचे दर्शन अशुभ मानतात. त्याचे दिसणे इतर पक्ष्यांसारखे आनंददायी तरी नक्की नसते. भेसूर दिसणारा तो पक्षी त्यामुळे रात्री-बेरात्री उगाच भटकंती करणाऱ्या, बिनकामाच्या, उडाणटप्पू मुलांसाठी उपमान बनला आहे. (उपमेयाचे साम्य ज्या दुसऱ्या गोष्टीशी कवी दाखवतात, तिला ‘उपमान’ असे म्हणतात.) 

– म.बा.कुलकर्णी gjcrtn@gmail.com
(‘शब्दचर्चा’ वरून उद्धृत  संपादित -संस्करीत)

About Post Author

Exit mobile version