आबासाहेब मुजुमदार

0
65
carasole

इतिहास संशोधक, शास्त्रीय संगीतातील उत्तम जाणकार सरदार आबासाहेब (गंगाधरनारायणराव) मुजुमदार हे प्रभुणे घराण्यातून मुजुमदार घराण्यात दत्तक आले.त्यांचा १०८ संस्थांशी विविध पदांचा संबंध होता.भारतभराच्‍या संस्‍थानिकांशी संबंध. भारत इतिहास संशोधक मंडळाच्‍या चिटणीस पदावर ते चोवीस वर्षे कार्यरत होते.त्‍यांचा फारसी भाषेचाही व्यासंग होता. गायनोपयोगी अशा तीस हजार चीजांचात्यांचा संग्रह होता.त्‍यांना अनेक व्‍यक्‍तींनी वाद्ये भेट दिली होती. या वाद्यांचाही त्‍यांनी संग्रह केला होता. हा संग्रह त्‍यांच्‍या वारसदारांनी डिजीटल स्‍वरूपात जपून ठेवला आहे. आबासाहेब मुजुमदार यांना चित्र, शिल्प, ताम्रपट, पोथ्या इत्यादी जमविण्याचाही छंद होता.

कसबा पेठेतील त्‍यांच्‍या स्वत:च्या पेशवाई वाड्यात त्‍यांनी सुरू केलेल्‍या गणेशोत्सवात कितीतरी गायक, गायिका गाऊन गेल्या आहेत.आबासाहेब मुजुमदारांचा वाडा संस्थानांप्रमाणे कलाकारांसाठी व्यासपीठ आणि आश्रयस्थान ठरला. आबासाहेब स्‍वतः उत्‍तम सतारवादक होते. तंतूवाद्यावर त्‍यांची हुकूमत होती. ते केवळ पाच मिनीटांत तंबोरा लावत असत. ब्रिटीश कालावधीत ते फर्स्‍ट क्‍लास सरदार होते. त्‍या काळात सरदार, इनामदार, जहागिरदार या सर्वांचा मतदार संघ होता. आबासाहेब त्‍याचे प्रतिनिधित्‍व करत. या मतदारसंघातून ते कायम बिनविरोध निवडून येत. त्‍या काळचे ते एमएलए एमपी होते. त्‍यांचा साधेपणाआणि निष्‍कलंक प्रतिमा ही त्‍यांची वैशिष्‍ट्ये होती. पु. ल. नी संगीताबद्दल केलेल्‍या लेखनात आबासाहेब मुजुमदारांचा संदर्भ दिलेला आढळतो. आबासाहेब मुजुमदार यांचे पुणे येथे १६ सप्टेंबर १९७३ रोजी निधन झाले.

About Post Author