– विलास म्हेतर
जैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पाविरुद्ध आंदोलनावर केलेला अमानुष गोळीबार, वारकरी आंदोलनात केलेला गोळीबार, मावळच्या शेतक-यांवर केलेला गोळीबार, मायावतीच्या राज्यात तेथील शेतक-यांवर केलेला गोळीबार….. या घटना गेल्या काही महिन्यांत घडल्या. येथे प्रत्येक वेळेला ब्रिटिशांप्रमाणे प्रत्येक आंदोलन गोळीबारानेच चिरडले गेले असल्याचे दिसते. याबद्दल ना सरकारला दुःख आहे ना प्रशासकीय यंत्रणेला! हीच आहे का लोकशाही? भारताला स्वातंत्र्य मिळून 64 वर्षे झाल्यानंतरही प्रत्येक वेळेला आपल्या मागण्या मांडण्यासाठी आम्हाला आंदोलनच का करावे लागते?
– विलास म्हेतर
मागील सहा महिन्यांत समाजामध्ये विविध स्तरांवर अनेक आंदोलने होत आहेत. हे सर्व पाहिल्यानंतर प्रश्न पडतो, की खरंच भारतामध्ये लोकशाही आहे का? जर लोकशाहीची व्याख्या, आम्हाला शाळेत शिकवल्याप्रमाणे ‘लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य’ अशी आहे, तर आज जे काही भारतात-महाराष्ट्रात घडत आहे, ते लोकशाहीच्या मार्गाने घडते असे म्हणण्याचे धाडस होत नाही. हे सर्व पाहिल्यावर एक तर लोकशाही व्यवस्था बदलायला हवी, किंवा लोकांना बदलायला हवे असे वाटते.
जैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पाविरुद्ध आंदोलनावर केलेला अमानुष गोळीबार, वारकरी आंदोलनात केलेला गोळीबार, मावळच्या शेतक-यांवर केलेला गोळीबार, मायावतीच्या राज्यात तेथील शेतक-यांवर केलेला गोळीबार….. या घटना गेल्या काही महिन्यांत घडल्या. येथे प्रत्येक वेळेला ब्रिटिशांप्रमाणे प्रत्येक आंदोलन गोळीबारानेच चिरडले गेले असल्याचे दिसते. याबद्दल ना सरकारला दुःख आहे ना प्रशासकीय यंत्रणेला! हीच आहे का लोकशाही?
भारताला स्वातंत्र्य मिळून 64 वर्षे झाल्यानंतरही प्रत्येक वेळेला आपल्या मागण्या मांडण्यासाठी आम्हाला आंदोलनच का करावे लागते? प्रत्येक आंदोलनामध्ये आंदोलक शहीद झाल्यानंतरच सरकार किंवा प्रशासकीय यंत्रणा जागी होणार का? असे असेल तर लोकशाहीची ढोंगे बंद करा. या सर्व परिस्थितीला कंटाळून नक्षलवादी, माओवाद्यांप्रमाणेच आणखी एक सशस्त्र संघटना उभी राहील की काय? अशी भीती मनात निर्माण होते. या सर्व परिस्थितीवर भारतातील व समाजातील प्रत्येक व्यक्तीने विचार करण्याची गरज आहे. नाहीतर भविष्यात गांधीजींचे फोटो फक्त नोटेवर असतील आणि त्यांची तत्त्वे फक्त पुस्तकात कैद असतील. अशा स्थितीत आपला देश इतर अस्थिर देशांच्या पंक्तीत जाऊन बसायला वेळ लागणार नाही.
– विलास म्हेतर, संगणक व्यावसायिक, भ्रमणधवनी: 9892777727, इमेल- netclick2005@gmail.com
{jcomments on}