अशोक महाराज शिंदे – व्‍यसनमुक्‍ती प्रवचनकार

0
30

सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील गुरसाळे येथील अशोक महाराज शिंदे हे व्यसनमुक्तीचा प्रचार करतात. ते किर्तनातून व्यसनमुक्तीचा संदेश तरुण पिढीला देत असतात. ते व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी गावोगावी फिरत असतात. त्यांनी कॉलेजला असताना सोलापूर विद्यापीठ युवा महोत्सवामध्ये मिमिक्री या कलाप्रकारात प्रथम पारितोषिक मिळवले आहे. त्यांनी व्यसनमुक्ती संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष म्हणून दोन वर्षें काम पाहिले आहे. त्यांना त्यांच्या कार्याबद्दल चार वेळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी 'मला मानधन म्हणून मिळणारे पाकिट मी कधीच उघडून बघत नाही’ असे सांगितले.

त्याच गावात खडानाथ महाराजांचे मंदिर असून तो त्याच्या डाव्या पायाच्या अंगठ्यावर उभा आहे.

अशोक महाराज शिंदे – 996035321/9096954483

– गणेश पोळ

About Post Author

Previous articleदहिगाव संस्थानचे वर्तमान
Next articleसोलापूरातील बुद्धविहार
गणेश पोळ यांनी 'विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय' येथून इतिहास या विषयात बी.ए.ची पदवी मिळवली. त्‍यानंतर ते शेतीकडे वळले. मात्र पत्रकारितेची आवड असल्‍याने त्‍यांनी 'सोलापूर विदयापीठा'तून मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले. त्‍यांनी सोलापूरातील 'दैनिक दिव्य जनसेवा' या दैनिकामध्ये उपसंपादक पदावर काम केले. राजकीय घटनांचे वार्तांकन करणे त्‍यांना आवडते. 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'च्‍या 'सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता. ते सध्‍या 'दैनिक दिव्‍य मराठी' वर्तमानपत्रात पत्रकारिता करतात. लेखकाचा दूरध्वनी 8888234781