अनंत हरि गद्रे

अनंत हरी गद्रे यांनी स्पृश्ये सवर्णांनी अस्पृश्यततेची रूढी पाडली; त्यामुळे त्यांनी प्रायश्चित्त घेऊन ती दूर करण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे असे ठासून सांगितले व  स्वतःला त्या कामासाठी वाहून घेतले. त्यांनी त्यासाठी झुणका-भाकर सहभोजन आणि स्पृश्याशस्पृश्यम सत्यनारायण ही दोन तंत्रे वापरली. ते दोन्ही उपक्रम 1941 मध्ये सुरू झाले. पंडित पानसेशास्त्री यांनी त्यावेळी पोथी सांगितली. समाजसुधारक र.धों. कर्वे त्यावेळी उपस्थित होते. त्या कामात त्यांना आचार्य अत्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर, सेनापती बापट, शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी अशा मान्यवरांचा पाठिंबा व सहकार्य होते. समतानंदांनी सामाजिक क्षेत्रात सहासन, सहभोजन, सहपूजन, सहवसन आणि सहबंधन (आंतरजातीय विवाह) या पंचशीलाचा पुरस्कार केला. ते जेथे नोकरी करत, त्या मोदी बंधूंच्या चित्रपट कंपनीच्या मालकांनी त्यांना आर्थिक सहाय्य केले हे खरे, पण ते तेवढे पुरेसे नसे. तेव्हा गद्रे यांना पदरमोड करावी लागे. त्यांना त्यासाठी कर्जही काढावे लागे.

गद्रे यांनी सत्यनारायणाच्या पूजेसाठी सिद्ध करण्यात येणार्या तूपसाखरेच्या शिर्याचा प्रसाद (सव्वाच्या प्रमाणात) गोरगरिबांना परवडणार नाही, म्हणून झुणकाभाकरीचा प्रसाद हरिजनांच्या हातून वाटण्याची प्रथा पाडली. सत्यनारायणाच्या पूजेसाठी यजमान म्हणून जोडपे बसवले जाते. गद्रे यांच्या सत्यनारायणात अस्पृश्यर समाजातील पती-पत्नीं ना यजमानपदी प्रतिष्ठित केले जाई. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे गद्रे त्या जोडप्याला लक्ष्मीनारायण मानून त्यांच्या पायांचे तीर्थ प्राशन करत. ते त्यावेळी ‘समाजमृत्युहरणं जातिद्वेषनिवारणं। हरिजनपादोदकर्तीर्थम्‌ जठरे धारयाम्यहम्‌’||
असा संकल्प करत.

समतानंद ‘ब्राह्मणादिकांची सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक अशी सर्वांगीण प्रतिष्ठा भंग्याला प्राप्त करून देणे’ अशी अस्पृश्यमतानिवारणाची व्याख्या करत. त्यांनी ‘‘ही समस्या माझ्यासारख्या अनेक सद्‌भावनाशील समाजसेवकांचा बळी घेईल’’ असा ‘जाहीर अंदाज’ही व्यक्त केला होता. ब्राह्मण सर्वांत श्रेष्ठ, पवित्र व शुद्ध मानून त्यांच्या पायांचे तीर्थ घेण्याचा धार्मिक विधी तेव्हा प्रचलित होता. त्याविरुद्ध आवाज उठवण्याचे काम बुद्धिवादी दृष्टीच्या ब्राह्मणेतर चळवळीने केले होते, पण समतानंदांनी त्या रूढीचा व्यत्यास करून उच्चवर्णीयांनी त्या अस्पृश्या्चे पादोदकतीर्थ प्राशन केले तरच ती खरी समता ठरेल असे सांगितले आणि ते प्रत्यक्ष कृतीत उतरवले. 

About Post Author