अग्निहोत्र – वैज्ञानिक दृष्टिकोन

2
51
_Agnihotra_VaidnyanikDrushtikon_2.jpg

अग्निहोत्र ह्या प्राचीन यज्ञविधीने आधुनिक काळात काही जाणकारांचे लक्ष वेधून घेतले आहे. यज्ञाचे सर्व उद्देश अग्निहोत्रात सर्वसामान्य माणसाला लाभू शकतात. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टीने त्याची उपयुक्तता सिद्ध करण्याचे काम पुण्याचे डॉक्टर प्रमोद मोघे गेली पाच-सहा वर्षें करत आहेत. त्यांनी अग्निहोत्राचे परिणाम तपासून बघितले.

अग्निहोत्र हा वैदिक संस्कृतीतील रोज केला जाणारा विधी आहे. अग्निहोत्र हा विधी घरी, दारी, शेतावर, कार्यालयात अगदी दहा मिनिटांत होऊ शकतो. अग्निहोत्रास सूर्योदय व सूर्यास्त ह्या दोन्ही वेळा उपयुक्त आहेत. अग्निहोत्रासाठी पुढील गोष्टी लागतात – 1. तांब्याचे पिरॅमिड पद्धतीचे हवन पात्र, 2. गायीच्या दुधाचे शुद्ध तूप – दोन चमचे, 3. गायीच्या शेणाच्या गोवऱ्या – चार तुकडे, 4. हातसडीचे आख्खे तांदूळ अंदाजे – चार ग्रॅम.

तांब्याच्या पात्रात गायीच्या गोवऱ्यांवर थोडे तूप लावून, त्या पेटवून त्यामध्ये गायीच्या तुपात भिजवलेले तांदूळदाणे सूर्योदयाच्या वेळी पुढील मंत्र म्हणत हवन म्हणून अर्पावे.

मंत्र असे –

सूर्याय स्वाहा: । सूर्याय इदम् न मम ।।
प्रजापतये स्वाहा: । प्रजापतये इदम् न मम ।।

सूर्यास्ताच्या वेळी अग्निहोत्र करणे असल्यास पुढील मंत्र म्हणावे –
अग्नेय स्वाहा: । अग्नेय इदम् न मम ।।
प्रजापतये स्वाहा: । प्रजापतये इदम् न मम ।।

हे सर्व आटोपल्यावर पाच मिनिटे शांतपणे अग्नीसमोर बसावे.

मोघे यांनी अग्निहोत्राचे परिणाम तपासून पाहण्यासाठी मुद्दाम पर्यावरणग्रस्त भाग निवडला. पुण्याच्या रमणबाग हायस्कूल (शनिवार पेठ) येथे हवेचे प्रदूषण प्रचंड प्रमाणावर आढळते. अग्निहोत्राचे प्रयोग शाळेतील वर्गात करण्यात आले. त्यात शाळेतील मुलांनी, शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी भाग घेतला. प्रयोगाकरता फर्ग्युसन महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान प्राचार्यांची; तसेच, पुणे विद्यापीठातील प्रयोगशाळा व प्राध्यापक यांची मदत घेतली गेली. ‘प्रज्ञा विकास मंचा’च्या FROST ह्या संस्थेने आर्थिक सहाय्य केले.

_Agnihotra_VaidnyanikDrushtikon_1.jpgअग्निहोत्रामुळे 1. सूक्ष्म जंतूंची वाढ जवळजवळ नव्वद टक्के थांबली. 2.  हवेतील घातक सल्फर डाय ऑक्साईडचे प्रमाण दहा पटीने कमी झाले. 3. रोपांच्या मोड असलेल्या बिया अग्निहोत्र खोलीत व शाळेच्या बाहेरच्या परिसरात ठेवण्यात आल्या होत्या. राख लावून ठेवलेल्या बिया-रोपांची वाढ अग्निहोत्र वातावरणात जोमाने व मोठ्या प्रमाणात अग्निहोत्र परिसरात न ठेवलेल्या बियांपेक्षा होते असे आढळून आले. 4. अग्निहोत्राची राख जंतूनाशक असल्याने जखमा, त्वचारोग ह्यावर ती उपयुक्त ठरते हेही प्रयोगानीशी सिद्ध झाले. 5. अग्निहोत्र राखेमुळे पिण्याच्या पाण्यातील जंतू व क्षार यांचे प्रमाण ऐंशी ते नव्वद टक्के कमी होते. त्यामुळे अग्निहोत्राचा उपयोग पाणी शुद्धिकरणासाठी होतो. हे सर्व फायदे फक्त दहा मिनिटांत मिळू शकतात. विधीला खर्च तीन ते पाच रुपये होतो.

मोघे यांनी ह्यापूर्वी पाणी शुद्धिकरणासाठी वेदात वर्णन केलेल्या पंधरा वनस्पतींचा उपयोग करून पाणी अगदी ‘मिनरल वॉटर’इतके शुद्ध करून त्याची जागतिक पेटंट्स मिळवली आहेत.

_Agnihotra_VaidnyanikDrushtikon_3.jpgअग्निहोत्र ह्या भारतीय संकल्पनेचा स्वीकार जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, पोलंड, झेकोस्लोव्हाकिया, जपान, सिंगापूर, पेरू, इक्वेडोर, स्वित्झर्लंड, स्पेन, कॅनडा इत्यादी सत्तर देशांनी केला असून त्यांनी विविध विज्ञान मासिकांत त्याचे निष्कर्ष प्रसिद्ध करणे चालू केले आहे. त्यांनी अग्निहोत्र आधारित शेतीला Homa Farming Technique असे नावही दिले आहे.

डॉ. प्रमोद मोघे, पुणे, मो. 9325380093

– प्रमोद मोघे

About Post Author

2 COMMENTS

  1. Dr. Pramod Moghe ji.V good…
    Dr. Pramod Moghe ji.V good article.Dr.R.N.SuklaRtd Sc.N.C.L.had done something in the past.

  2. अतिशय उपयुक्त माहिती . खूप…
    अतिशय उपयुक्त माहिती . खूप धन्यवाद

Comments are closed.