Home Search
किल्ल्यांवर - search results
If you're not happy with the results, please do another search
किल्ले सुतोंडा (Sutonda Fort)
अजिंठ्याच्या डोंगररांगेत अनेक किल्ले आहेत, पण दौलताबाद किंवा अंतूरसारखे प्रसिद्ध किल्ले वगळता या किल्ल्यांच्या वाटेवर फारसे ट्रेकर्स वळत नाहीत. सुतोंडा हा असाच या रांगेतील फारसा माहीत नसलेला किल्ला. हा किल्ला यादवकालीन असावा असा तज्ज्ञांचा कयास आहे. किल्ल्यावर असलेल्या लेण्यांखेरीज याला पुरावा नाही. सुतोंडा पाहायला जो कोणी जातो, तो तिथले पाण्याचे व्यवस्थापन पाहून चकित होतो. आजूबाजूच्या दुष्काळी प्रदेशात सुतोंड्यावर बारमाही पाणी असते. अशा ह्या अप्रसिद्ध किल्ल्याविषयी सुभाष बोरसे माहिती देत आहेत...
साल्हेर आणि मुल्हेर किल्ले (Salher and Mulher Forts)
नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यातले साल्हेर आणि मुल्हेर हे दोन आवळे जावळे किल्ले, महाराष्ट्र आनि गुजरातच्या सीमेवर वसलेले आहेत. पैकी साल्हेर हा महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त...
नाणेघाट (Naneghat)
सातवाहन हे इसवी सन पूर्व 222 ते इसवी सन 228 या काळातील महाराष्ट्रातले पहिले ज्ञात ऐतिहासिक राजघराणे. त्यापूर्वीचा महाराष्ट्राचा इतिहास फारसा उजेडात आलेला नाही. कल्याण-जुन्नर मार्गावरील नाणेघाटाच्या परिसरात सातवाहनांच्या राज्यांची प्रथम स्थापना झाली. नाणेघाट हा तेव्हा उत्तरेकडून कोकणात उतरण्याचा मुख्य मार्ग होता. जुन्नर हे सातवाहनांचे राजधानीचे शहर आणि व्यापारी केंद्र असल्यामुळे तेथे अनेक रोमन, ग्रीक व्यापाऱ्यांनी वस्ती केल्याचे पुरावे सापडतात...
दुर्गादास परब : शिस्तबद्ध, प्रामाणिक, कामसू…
सभोवताली नैराश्येचे वातावरण असताना नेहमीची चाकोरीबद्ध वाट सोडून नवी वाट चोखाळणारे शिस्तबद्ध, प्रामाणिक आणि कामसू अशी प्रतिमा असणारे दुर्गादास परब. दुर्गादास यांना ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’तर्फे 2023 चा बाळासाहेब घमाजी मेहेर स्मृतिप्रित्यर्थ ‘जीवन प्रतिभा पुरस्कार' देऊन गौरवण्यात आले आहे…
सच्चा दुर्गमित्र अजय गाडगीळ !
अजय गाडगीळ यांच्याकडे गीर्यारोहण क्षेत्रातील एक उगवता तारा म्हणून पाहिले जाते. सह्याद्री पालथा घालणारा हा मावळा गिर्यारोहण, गड-किल्ल्यांचे संरक्षण व संवर्धन, निसर्गरक्षण आणि आपत्कालीन बचावकार्य यालाच ध्येय मानून त्या दिशेने यशस्वी घोडदौड करत आहे...
राजाळे गावची एकता अभंग
राजाळे गाव सातारा जिल्ह्यात फलटणपासून पूर्वेला बारा किलोमीटर अंतरावर आहे. ते गाव सधन व विकसनशील आहे..समाजप्रबोधन हेच ब्रीद मानून वैचारिक परंपरा असलेले गाव म्हणून राजाळे गाव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे...
नेहरोलीच्या होळीत लापसुटीची मजा (Nehroli Village in Palghar dist in Gavgatha)
नेहरोली हे गाव पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील दक्षिण सीमेवर वसलेले आहे. ते पालघर जिल्ह्याच्या ठिकाणापासून साधारण साठ किलोमीटरवर येते. गाव आहे निसर्गरम्य, परंतु औद्योगिकीकरण आणि दळणवळणाच्या सोयी यांमुळे गावाचा विकासही साधला गेला आहे.
गाविलगड – स्थलानुरूप जल नियोजनाचा वारसा (Gavilgad – Bahamani fort is known for its...
गाविलगड किल्ला हे विदर्भाचे भूषण आहे. तो किल्ला अमरावतीतील चिखलदऱ्याजवळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधे आहे. तो सातपुडा पर्वतरांगांच्या मध्यावर येतो. मेळघाटातील डोंगरद-यांमध्ये विखुरलेली किल्ल्याची व्यापकता आणि गडावरील वास्तुशिल्पातील कलाकुसर पाहून मन थक्क होऊन जाते.
गड-किल्ल्यांचे जलव्यवस्थापन
गडकिल्ल्यांवरील पाण्याचे महत्त्व रामचंद्रपंत अमात्य (छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमलेल्या अष्टप्रधान मंडळातील राजनीतीचे प्रधान) यांच्या आज्ञापत्रात दिले आहे - “... तसेच गडावरी आधी उदक पाहून...
वसई चर्चमधील घंटा हिंदू मंदिरांत! (Bells From Vasai church in Hindu Temples)
चिमाजी अप्पांनी वसई परिसरातील किल्ले पोर्तुगीजांकडून जिंकून घेतल्यानंतर तेथील वेगवेगळ्या चर्चमधून ज्या घंटा मिळाल्या त्या महाराष्ट्रातील विविध मंदिरांत नेऊन बसवण्यात आल्या आहेत. फादर कोरिया...