कराड येथे 1975 साली भरलेल्या एक्कावन्नाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान ज्येष्ठ लेखिका दुर्गा भागवत यांना लाभला. दुर्गाबाई लोकसंस्कृती तसेच लोकसाहित्याच्या संशोधक, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र व बौद्ध धर्म यांच्या अभ्यासक आणि लेखन-विचार-स्वातंत्र्याच्या झुंजार पुरस्कर्त्या होत्या. त्यांचा जन्म इंदूर येथे झाला. त्यांचे कुटुंब मूळचे पंढरपूरचे. ते नंतर बडोद्याला स्थायिक झाले. त्याकाळी बडोदा हे भारतातील एक संस्थान होते. दुर्गाबाईंचे कुटुंब सुशिक्षित होते. वडील शास्त्रज्ञ होते आणि त्यांची बहीण कमला सोहोनी भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ होत.
दुर्गाबाईंचे शालेय शिक्षण मुंबई, नगर, नासिक, धारवाड, पु
त्या गोखले अर्थशास्त्र संस्था (पुणे) येथे 1958 ते 60 अशी दोन वर्षे समाजशास्त्र विभागाच्या प्रमुखपदी होत्या. त्यांनी साहित्य-सहकार ह्या मासिकाचे वर्षभर (1957) संपादनही केले. त्यांनी संशोधन-लेखन यांसाठी नोकरी व्यवसायापातून मुक्तता घेतली. त्यांचा पहिला इंग्रजी ग्रंथ अर्ली बुद्धिस्ट ज्युरिस्प्रुडन्स (1938) हा होता. तसेच त्यांचा पहिला मराठी ग्रंथ राजारामशास्त्री भागवत हा होय. व्यक्तिचित्र व वाङ्मयविवेचन (1947) आणि पहिला मराठी ललित ग्रंथ महानदीच्या तीरावर–गोंड जीवनावरील नवलिका-(1956) हा होय. त्यांना ललित लेखनाची प्रेरणा साने गुरूजींकडून मिळाली असे त्या म्हणत.
दुर्गाबाईंनी लेखनास प्रारंभ संशोधनपर वैचारिक लेखनाने केला. त्यांचे समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, लो
त्या मुंबईच्या एशियाटिक सोसायटीच्या सक्रिय सभासद होत्या. त्यांनी रविंद्रनाथ टागोरांच्या गीतांजली या काव्यसंग्रहाचे संस्कृत भाषांतर केले. त्यांच्या लोकसाहित्याने मराठी साहित्यात व लहान मुलांच्या कथांमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवले. त्यांच्या तुळशीचे लग्न, चंद्रलेखा आणि आठ चोर, वनवासी राजपुत्र या कथा मुलांमध्ये प्रिय होत्या. त्यांच्या मृत्युपश्चात ‘वर्ल्ड पब्लिकेशन’ने त्यांची चार पुस्तके प्रकाशित केली. त्यामध्ये त्यांच्या उच्च साहित्यमूल्ये असलेल्या लेखांचा समावेश होता. त्याचे संपादन व संकलन मीना वैशंपायन यांनी केले आहे. ‘मराठी सारस्वतांची सरस्वती’ या नावाने दुर्गाबाईंचा गौरव झाला. त्यांनी लिहिलेल्या ललित पुस्तकांपैकी व्यासपर्व, ऋतुचक्र, डूब, भावमु
दुर्गा भागवत या त्यांच्या लेखनातून सृष्टीच्या निसर्गचक्रानुसार बदलत जाणाऱ्या घटनांचे वर्णन करतात. त्यांच्याकडे ललित लेखनासाठी आवश्यक असणारी संवेदनशीलता, निरीक्षणक्षमता, चिं
त्यांनी 1975 साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीविरूद्ध स्पष्ट भूमिका घेतली होती. त्यांचे म्हणणे आणीबाणीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कावर गदा येते असे होते. त्यांनी साहित्य संमेलनाच्या भाषणात आणीबाणीवर टीका केली. त्या जाहीर विरोधाबद्दल त्यांना अटकही झाली. मराठी साहित्य संमेलनासाठी 1977 साली गोवा सरकारने मदत केली होती. त्यामुळे गोव्याच्या मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांना संमेलनाला बोलावण्याचा निर्णय झाला. मात्र, त्यालाही दुर्गाबाईंनी कडाडून विरोध केला. साहित्य आणि राजकारण एकत्र आणू नये, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी भारत सरकारबरोबर असलेल्या मतभिन्नतेतूनच पद्मश्री व ज्ञानपीठ हे दोन्ही पुरस्कार नाकारले.
त्या साहित्य संमेलनात म्हणाल्या, की “लेखकाचे समाजाच्या जडणी-घडणीत काय स्थान आहे हे त्याच्या अस्मितेवर आणि त्याचे समाजमनाशी जे ताद्रूप्य घडते, त्यावरच अवलंबून असते. पंचवीसतीस वर्षांपूर्वी लेखक हा एकप्रकारे वैचारिक अधिष्ठाता समजला जात असे. नेत्याचे भाग्य त्याला लाभत असे. खांडेकर, फडके वगैरेंच्या सभांना राजकीय सभांसारखीच गर्दी व शान असे. पण आता हे मानबिंदू ढळल्याचे दिसते. लेखकाच्या पुस्तकापेक्षाही रेडिओ, टीव्ही व वर्तमानपत्रे यांतून होणारे त्याचे दर्शन अधिक महत्त्वाचे गणले जाऊ लागले आहे. ही सार्वजनिक माध्यमे त्यांचे त्यांचे तंत्र लेखकाला आत्मसात करायला लावत आहेत. तत्काळ धनप्राप्ती, प्रसिद्धी आणि प्रसार यांना लेखकही सहज वश होतो आणि निखळ लेखनाचे जुने तंत्र बाजूला ठेवून तो इतर प्रसंगीही या तंत्रांच्या चौकटीतच फार खोलवर न जाता, त्यांच्या विषयाच्या व आशयाच्या मर्यादा जणू त्याच दूरवर परिणाम करणाऱ्या आहेत असा समज करून घेऊन चुरचुरीत भाषा, थोडी करुणा, थोडा विनोद, माहितीचे अपुरे तुकडे वगैरेंचा एक रंगीन आकृतिबंध निर्माण करून लोकांचे रंजन करतो.
माणसा-माणसांतले परस्परसंबंध, क्रिया-प्रतिक्रिया, प्रेरणा आणि उद्गार यांच्यातली नवी नाती आपण नव्यानेच हुडकतो आहोत. तत्त्वज्ञानदेखील एक शास्त्रच आहे. मानवाच्या ध्येयसृष्टीविषयी, त्याच्या वैयक्तिक आणि समष्टियुक्त जीवनातल्या सुसंगती आणि विसंगतींबद्दल हे शास्त्र आता नव्या वाटा दाखवत आहे. नवी क्षितिजे निर्माण करण्याची आत्यंतिक गरज आज विज्ञान आपल्याला पटवून देत आहे. कुठल्याही लेखकाला त्याच्या विषयाचे शास्त्रीय आकलन काही प्रमाणात तरी असल्याशिवाय त्याचे आज निभणार नाही. वैज्ञानिक कथाकादंबऱ्यांची आज नितांत गरज आहे. दि. बा. मोकाशी, नारायण धारप वगैरेंनी अशा स्वरूपाच्या काही कथा दिल्या आहेत. त्या सद्यः परिस्थितीत आपण स्वीकारतोच आहोत आणि असे प्रयत्नही होतील तेवढे व्हायलाच हवेत. परंतु मराठीत वैज्ञानिक कथेचे खरंखुरं क्षितिज जर कोणी प्रथमच खोलले असेल तर ते डॉक्टर जयंत नारळीकरांनी. ते स्वतः विश्वविख्यात वैज्ञानिक आहेत.
दुर्गाबाई कायम साहित्य आणि संशोधनात बुडालेल्या असत. त्यांना स्वयंपाक करण्यातही रस होता. त्यांना नवनवीन पदार्थ बनवण्यास व पाककृतींविषयी लिहिण्यास आवडत असे. त्यांनी जगाचा निरोप 7 मे 2002 रोजी घेतला. तेव्हा त्या ब्याण्णव वर्षांच्या होत्या.
संकलन – टीम थिंक महाराष्ट्र
खुप छान लेख वाचायला मिळाला