सचिन तेंडूलकरला भारतरत्न देण़्यामध़्ये काही अडचणी येत आहेत. ज्या क्षेत्रांमध्ये काम केलेल्या व्यक्तींना भारतरत्न देण्यात, त्यामध़्ये क्रीडा क्षेत्राचा समावेश नाही. क्रीडा क्षेत्रात कार्यरत राहून देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणा-या खेळाडूंनाही भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करणे गरजेचे आहे, हा विचार आजपर्यंत सरकारला कधीच आला नाही. मात्र आता उशीरा का होईना, ही तरतूद करून केवळ सचिनच नव्हे तर इतर खेळाडूंचाही भारतरत्नासाठी विचार व्हावा.
अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे सरकारने लोकपाल विधेयकासाठीच्या मागण्या तूर्तास मान्य केल्या असल्या तरी संसदेत हे विधेयक संमत होईल असे वाटत नाही. लोकपाल विधेयकामुळे राजकारण्यांवर अनेक बंधने येणार हे निश्चित. भ्रष्टाचाराच्या बाबतीत त्यांच्यावर अंकुशही लागेल. विचारात घेण्याजोगा मुद्दा असा, की निवडणुका किंवा तत्सम कार्यक्रमांमध्ये मोठ्या पैशांची आवश्यकता असते. हे सगळे कार्यक्रम घोटाळे आणि भ्रष्टाचार केल्याशिवाय पार पडणे अशक्यच वाटते. अशा वेळी लोकपाल विधेयकाद्वारे स्वतःवर अंकुश लादण्यास कोणताच राजकारणी सहमत नसेल. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातही या विधेयकावर संमतीची मोहर लागणे, ही अशक्य गोष्ट भासते.
– राजेश पाटील अकाउंटन्ट, अलख अॅडव्हर्टायझींग अॅण्ड पब्लिसिटी
दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.
गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्यासारख्या व्यक्तींच्या साथीने ‘ग्रंथाली’ची स्थापना केली. ती पुढे महाराष्ट्रातील वाचक चळवळ म्हणून फोफावली. त्यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्तके त्यांनी संपादित केली. त्यांनी संपादित केलेल्या मासिके-साप्ताहिके यांमध्ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्थापक सदस्य आहेत.
साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्क्रीन इज द वर्ल्ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्कार, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ व ‘मराठा साहित्य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार लाभले आहेत.