विजया चौहान / डॉ. रवीन थत्ते
चित्रकार मकबूल फिदा हुसेन निर्वतले. त्यांच्या चित्रांबद्दल आणि पर्यायाने ..
हुसेन यांच्या चित्रांचा चुकीचा अर्थ काढला
चित्रकार एम. एफ. हुसेन गेल्याचे कळले आणि फार दुःख झाले. त्याचं आणि माझा वैयक्तिक परिचय नव्हता, मात्र अशा व्यक्तिंशी माध्यमांमधूनही एक नाते तयार होत असते. वाईट या गोष्टींच वाटते, की पंढरपूरात जन्मलेल्या हुसेन यांना आपल्या चित्रांवरून निर्माण झालेल्या वादामुळे भारत सोडून कतारमध्ये स्थायीक व्हावे लागले. हिंदुत्ववाद्यांनी नेहमीच त्यांच्या चित्रांचा चुकीचा अर्थ काढून त्यांच्याविरोधात जनमत तयार केले. त्यांचे निधन झाल्यानंतर नॅशनल जिओग्राफिक चॅनेलवर त्यांच्या चित्रांवर आधारित एक कार्यक्रम दाखवण्यात आला. यात हसेन यांची चित्रे कशी पहावीत, याचे सुरेख विवेचन करण्यात आले.
– विजया चौहान
शिक्षण हक्क समन्वय समिती
आणि मराठी अभ्यास केंद्र.
हुसेन यांच्या चित्रांना वादांमुळेच प्रसिद्धी
एम. एफ. हुसेन यांनी आचरटपणा केला नसता तर त्यांना वृत्तपत्रांतून एवढी प्रसिद्धी मिळाली असती का? या प्रश्नाचे उत्तर आपण सगळ्यांनीच द्यायला हवे. ज्ञानेश्वरीत दांभिकपणाची जी लक्षणे सांगितलेली आहेत, त्यामधील ओवीत असे म्हटले आहे, की ‘जी माणसं दांभिक असतात, ती प्रसिद्धीसाठी आपल्या आईलाही बाजारात उघडी करतील.’ हुसेन कलाकार असल्याने सरस्वती ही त्याची आई झाली, मात्र त्यांनी तिचीही वादग्रस्त छायाचित्रे काढली. त्यांना एकदा विचारण्यात आले, की तुम्ही महंमद पैगंबरांची अशी चित्रे का नाही काढली? मात्र त्यावर त्यांनी कधीच उत्तर दिले नाही. मी हिंदुत्ववादी नाही, मात्र कधी कधी कलाकरांचा अशा बाबतीत समतोल ढासळतो.
– डॉ. रवीन थत्ते
प्लास्टीक सर्जन
{jcomments on}