Home वैभव मराठी भाषा वर्किंग लंच

वर्किंग लंच

_Working_Lunch_1.jpg

‘वर्किंग लंच’ या मूळ शब्दाचा अर्थ व मराठीत या शब्दाने धारण केलेला अर्थ यांमध्ये तफावत आहे. तो मराठीत ज्या अर्थाने शब्द वापरला जातो. त्याकरता ‘लघुभोजन’, ‘चटभोजन’ इत्यादी पर्याय सुचवण्यात आलेले आहेत. परंतु मराठीत रुळलेला एक पर्याय ‘वर्किंग लंच’ला सुचवावासा वाटतो.

‘डबा’ किंवा ‘जेवणाचा डबा’ हा मराठीत ‘कामाच्या दरम्यान छोटी सुट्टी घेऊन केलेले मर्यादित अन्नसेवन’ यासाठी सहज दैनंदिन व्यवहारात वापरला जाणारा शब्दसमूह आहे. तो ‘वर्किंग लंच’साठी वापरता येऊ शकेल. कामाच्या मध्ये थोडा वेळ काढून केले जाणारे अन्नसेवन; तसेच, जेवणाच्या पदार्थांची परंतु मर्यादित संख्या ह्या दोन्ही गोष्टी ‘जेवणाचा डबा’ ह्या शब्दप्रयोगात अभिप्रेत आहे. ‘वर्किंग लंच विल् बी सर्व्हड’ अशी चर्चासत्रांच्या आमंत्रण पत्रिकेत असणारी सूचना मराठीत ‘जेवणाच्या डब्याची सोय करण्यात येईल’ अशी देता येईल, नाही का?

(भाषा आणि जीवन, २०१३ वरून उद्धृत)

– अनघा भट-बेहेरे

About Post Author

2 COMMENTS

  1. Working lunch ह्या इंग्रजी…
    Working lunch ह्या इंग्रजी संज्ञेचा इथे निखालस चुकीचा अर्थ लावलेला आहे. मी गेली २५ वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रात वावरत आहे आणि इथे हा शब्दप्रयोग अतिशय वापरला जातो. कामातून (विशेषतः मिटींग्स मधून) जेव्हा जेवणास वेळ काढणे शक्य नसते, तेव्हा वेळ वाचवण्यासाठी मिटिंग चालू असताना जेवणे ह्याला working lunch हा शब्दप्रयोग वापरला जातो. अशा प्रसंगास लेखात सुचवलेले सर्वच शब्दप्रयोग अनुचित आहेत.

  2. आशिष देशपांडे,
    धन्यवाद…

    आशिष देशपांडे,
    धन्यवाद. तुमची ही प्रतिक्रिया संपादकीय मंडळास कळवत आहोत. तुमचा मुद्दा योग्य असल्यास लेखात तसा बदल करू.
    – ‘टीम थिंक महाराष्ट्र’

Comments are closed.

Exit mobile version