– मदन धनकर
महाराष्ट्र राज्य स्थापनेस १ मे २०१० ला पन्नास वर्षे पूर्ण झाली. अर्धशतकपूर्तीनिमित्त आत्मपरीक्षणासाठी व पुढील वाटचालीसाठी गेल्या पन्नास वर्षांतील स्थितिगतीचा आढावा जसा आवश्यक आहे ; तसा तो शतकाच्या मध्यंतरानंतर एकत्र आलेल्या मराठी भाषकांच्या सांस्कृतिक उन्नयनाचा विचार करणार्या संस्था, शासन व लोक यांच्या परिशीलनासाठीही जरूरीचा आहे. सांस्कृतिक एकात्मतेचा विचार मनीमानसी मुरल्याशिवाय एकत्र काम करण्याची ऊर्मी जागी होत नाही. संयुक्त महाराष्ट्रात मुंबई, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ यांचा प्रथमच एकत्र एका राज्यात समावेश झाला. त्यांच्या प्रगतीचा विविध मार्गांनी विचार करत असताना मनोमिलनाचा तपशील लक्षात घेतला पाहिजे. सांस्कृतिक एकात्मतेच्या जागरासाठी ते जरुरीचे आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापनेस १ मे २०१० ला पन्नास वर्षे पूर्ण झाली. अर्धशतकपूर्तीनिमित्त आत्मपरीक्षणासाठी व पुढील वाटचालीसाठी गेल्या पन्नास वर्षांतील स्थितिगतीचा आढावा जसा आवश्यक आहे ; तसा तो शतकाच्या मध्यंतरानंतर एकत्र आलेल्या मराठी भाषकांच्या सांस्कृतिक उन्नयनाचा विचार करणार्या संस्था, शासन व लोक यांच्या परिशीलनासाठीही जरूरीचा आहे. सांस्कृतिक एकात्मतेचा विचार मनीमानसी मुरल्याशिवाय एकत्र काम करण्याची ऊर्मी जागी होत नाही. संयुक्त महाराष्ट्रात मुंबई, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ यांचा प्रथमच एकत्र एका राज्यात समावेश झाला. त्यांच्या प्रगतीचा विविध मार्गांनी विचार करत असताना मनोमिलनाचा तपशील लक्षात घेतला पाहिजे. सांस्कृतिक एकात्मतेच्या जागरासाठी ते जरुरीचे आहे.
पंजाबराव देशमुख यांचे भारतीय स्तरावरील कार्य अद्वितीय आहे. त्यांनी भारतातील पहिल्या कृषी विद्यापीठाच्या स्थापनेपासून तर जागतिक कृषी मेळाव्यापर्यंत घेतलेली गरुडझेप भारताच्या प्रगत कृषिजीवनाची साक्ष आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या स्थापनेतून तर त्यांनी भारतातील लोकविद्यापीठ उभे केले. अरुण शेळके यांनी व्यक्त केलेल्या भावना त्या कृतीशी सुसंवादी आहेत.
संपादक, प्राचार्य रमेश अंधारे यांनी प्रवर्तन-प्रस्तावनेत लेखकांच्या विचारांचा समर्थ परामर्श घेतला आहे. ते म्हणतात, की “ ‘मुद्रा महाराष्ट्राची’ हा ग्रंथ आधुनिक महाराष्ट्राचा जागतिकीकरण, खाजगीकरण व उदारीकरणाच्या कालपटावर मुखर होणारा चेहरा दाखवणारा आहे. वर्तमान राजकीय प्रश्न माध्यमांमुळे आपल्याला महत्त्वाचे वाटत असले, तरी शिक्षण, शेती, विज्ञान-तंत्रज्ञान, धर्म आणि साहित्य या सर्व अंगांनी जीवनाची समग्रता आकार घेते आणि त्यातूनच आपला जीवनाविषयीचा दृष्टिकोन संपृक्त होत जातो. आपली संस्कृती व साहित्य समृद्ध होत आहे. संस्कृतीच्या या सर्व जीवनांगांचे सूत्र या ग्रंथातल्या लेखांमधून गुंफण्याचा प्रयत्न केला आहे”
२.‘महाराष्ट्राचे महामंथन’ हा लालजी पेंडसेलिखित ग्रंथ संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे प्रत्येक पान, इतिहासाची साक्ष देऊन आपल्यापुढे मोकळे करतो. डाव्या चळवळीत मुरलेले आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत घोळलेले लालजी घटनांचा तपशील देऊ लागले, की अनेक घटनांतील सत्यदर्शनाची दारे सताड मोकळी होतात. या, १९६५ साली प्रकाशित ग्रंथाची दुसरी आवृत्ती प्रा. एन. डी. पाटील यांच्या प्रस्तावनेने सार्थ झाली आहे. महाराष्ट्र राज्य संयुक्त होऊन भारताच्या नकाशावर साकार झाले, त्याचे श्रेय विरोधी पक्षांनी एकजुटीने दिलेला निडर व घणाघाती लढा याला असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. महाराष्ट्रातील व तत्कालिन भारतातीलही संभ्रमित काँग्रेस त्यांच्या लेखनात आपल्याला दिसते. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील बिनीचे नेते भाषावार राज्यरचना आणि महाराष्ट्राची स्थापना याबद्दल कमालीचे पूर्वग्रह बाळगून होते हे लालजींनी दाखवून दिले.
एकात्म घटक राज्यांच्या कल्पनेचा उदय व विकास हा सुमारे तीस पृष्ठांचा मजकूर ब्रिटिश भारतातील हळुहळू विकसित प्रांतरचना आणि विकसित राज्यांची पार्श्वभूमी स्पष्ट करणारा आहे. संयुक्त महाराष्ट्राचा मोर्चे व निदर्शने, मैदानी सभा, विधिमंडळातील व संसदेतील ठराव यांतून मुखरित लढा अतिशय तपशिलाने यामध्ये आला आहे. सभा-संमेलनांच्या रणांगणावरील ओजस्वी वाग्युद्धाबरोबर विधिमंडळ व संसद यांतील वादविवादाचे स्वरूप आणि त्यातील भिन्न राजकीय पक्षांची भूमिका व नेत्यांची कधी सौम्य, कधी निर्णायक तर कधी सतत बदललेली मते व पवित्रे लक्षात येतात, राजकीय पक्ष आणि मूर्धन्य नेत्यांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने उपलब्ध जिवंत साधने लोकशाहीतील अभ्यासकांना व विचारवंतांना वेळोवेळी सावध करणारी आहेत. पक्षोपपक्षांतील नेत्यांचे डावपेच, एकमेकांवर कुरघोडी करण्याची नेत्यांची हातघाई आणि पक्षीय अभिनिवेश यांचे साधार पण मनोज्ञ दर्शन घडते. सर्वत्र श्रेयासाठी सुरू असलेला आटापिटा दिसतो. श्रेयातील आटा म्हणजे कणिक कुणाची, पिटाई झाली कुणाची, पाणी कुणाचे, कणिक कुणाची तिंबली गेली याचा विस्तृत पट या ग्रंथात आहे. मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण यांतील नेत्यांचे डावपेच व लढाऊ बाणा यांतून प्रादेशिक नेतृत्वाच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन उपलब्ध होते. संघर्षातील ठशांची मोजदाद करणारा महत्त्वाचा ग्रंथ म्हणून लोकवाङ्मय गृहाने दिलेली ही देणगी आहे. विजय मोहिते यांनी काढलेली नेत्यांची चित्रे चाहत्यांनी संग्रही ठेवावी एवढी अप्रतिम उतरली आहेत. स्वातंत्र्योत्तर दोन दशकांतील वृत्तपत्रांच्या धोरणाचे विश्वसनीय साधन म्हणूनही या ग्रंथाचा विचार केला पाहिजे.
यातील सारे लेख वाचनीय आहेत. भिन्न नियतकालिकांत प्रकाशित लेख एकाच आशयाचा राग आळवणारे नाहीत. ‘महाराष्ट्र दिना’च्या निमित्ताने, प्राचार्य नरहर कुरुंदकर यांचा लेख… भाषावार प्रांतरचनेच्या संकल्पनेचा सकारात्मक आढावा यात असून कुरुंदकरांची मांडणी विश्लेषक आहे. भारताबाहेर असलेल्या देशांची उदाहरणे देत असताना, त्यांनी हैदराबाद संस्थानाचे उदाहरणही दिले आहे. संघराज्य आणि लोकशाही बळकट करण्यासाठी तत्त्वनिष्ठ वागणूक व मागासलेल्यांना अग्रहक्क देणारी आर्थिक न्यायाची कल्पना स्वीकारली पाहिजे असे प्रतिपादन केले आहे. ‘महानुभाव साहित्यातील महाराष्ट्र’ असा वेगळा लेख त्या विषयाचे अधिकारी अभ्यासक प्रा. रमेश आवलगावकर यांचा आहे. ‘महाराष्ट्राचे प्राचीन कलावैभव’ हा प्रभाकर देव यांचा व ‘महाराष्ट्राची कुळकथा’ हा अरुणचंद्र पाठक यांचा, हे संशोधमूल्य असलेले लेख आहेत. यशवंतराव चव्हाण, काकासाहेब गाडगीळ, जयंतराव टिळक व नानासाहेब गोरे यांचे लेख संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा मागोवा घेणारे आहेत. भा.ल.भोळे यांचा भाषावार प्रांतरचनेची फलश्रुती आणि मधुकर भावे यांचा ‘महाराष्ट्र होता कुठे आणि चालला कुठे?’ हे लेख संयुक्त महाराष्ट्राच्या घटितानंतरच्या वस्तुस्थितीची मीमांसा करणारे असल्यामुळे अंतर्मुख करणारे असे आहेत.
५.महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात काही नियतकालिकांनी दर्जेदार अंक प्रकाशित केले आहेत. त्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘लोकराज्य’चा एप्रिल-मे २०१० चा अंक एकशेचौदा पृष्ठांचा काढला आहे. त्यात संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावर प्रकाश टाकणारे लेख आहेत. त्यानंतर पन्नास वर्षांतील शिक्षण, आरोग्य, रंगभूमी, चित्रपट, उद्योग, सहकार चळवळ, विज्ञानसंशोधन, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, पंचायत राज्यव्यवस्था, आर्थिक प्रगती, पर्यटन, क्रीडा, साहित्य, वंचितांचे कल्याण व महिला सक्षमीकरण यासंबंधी जाणत्या अभ्यासकांनी लिहीले आहे. शासनाच्या अधिकृत मासिकातून ते प्रकाशित झाल्यामुळे महत्त्वाचे विद्यमान संदर्भसाधन उपलब्ध झाले आहे. ‘लोकराज्य’ केवळ वाचनीय नव्हे तर संग्राह्य असते.
६.पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या शताब्दीनिमित्त ‘नवभारत’ मासिकाचा जुलैचा अंक प्रकाशित झाला आहे. त्याचेही स्वागत केले पाहिजे. मे-जूनचा सुवर्ण महाराष्ट्र विशेषांक हाही सरस प्रयत्न आहे. मुळात, प्रकाशित लेख राजहंस प्रकाशनाकडून उपलब्ध झाल्याचे संपादकीय निवेदन आहे. यांतील विषय नेमके व लेखक व्यासंगी आहेत. राजहंस प्रकाशनाने ‘नवभारत’ची झोळी भरून दिली. राजहंस प्रकाशनासारख्या मातब्बर व चौफेर दृष्टी असलेल्या प्रकाशनाने ग्रंथ प्रकाशनातून माघार घेतली काय? ते हा ग्रंथ करणार नाहीत का? साधनसामग्रीसंपन्न ‘राजहंस’ने हा प्रकल्प पुन्हा हाती घेऊन तडीस नेला पाहिजे. अशोक चौसाळकर, किशोर महाबळ, मेधा दुभाषी, सुधीर मोघे, विश्वास सहस्रबुद्धे, सुधीर नांदगावकर व करुणा गोखले हे सारे लेखक समर्थ आहेत. प्रकाशनाने व्यापक भूमिका घेऊन प्रा. गं.बा. सरदार संपादित ‘महाराष्ट्र जीवन: परंपरा, प्रगती आणि समस्या’ अशा द्विखंडात्मक ग्रंथाच्या धर्तीवर नवा ग्रंथ सिद्ध केला पाहिजे. त्यांच्या क्षमतेसाठी हे आव्हान नाही.
८.महाराष्ट्र राज्य सुवर्ण महोत्सव सिंहावलोकन परिषदेचे मन:पूर्वक स्वागत केले पाहिजे. सुवर्ण महोत्सवी वर्षात महाराष्ट्रातील व्यापक जनाधाराला विश्वासात घेत हा प्रयत्न सुरू आहे. शांतिनिकेतन लोकविद्यापीठ, सांगली यांनी हा पुढाकार घेतला आहे. प्रा. डॉ. पी.बी. पाटील यांनी त्याचे आयोजन केले आहे. पहिली परिषद नाशिकला मार्चमध्ये, दुसरी सांगलीस जूनमध्ये, तिसरी औरंगाबाद येथे व चौथी धुळे जिल्ह्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात झाली. परिषदेत सहभागी नेते तपस्वी असून त्यांचा हेतू महाराष्ट्राची एकात्मता दृढ करणारा आहे. अमरावती येथे अमरावती विभागाची तर चंद्रपूरला नागपूर विभागाची परिषद झाली. आयोजनाची मांडणी व स्वरूप नेमके आहे. अमरावती परिषद औचित्यपूर्ण आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीस अमरावतीचा पाठिंबा मोठा असल्याची नोंद आहे. नागपूर विभागाची परिषद चंद्रपूरला घेण्यामुळे हा प्रयत्न अनुसूचित जाती-जमाती लोकसंख्याबहुल क्षेत्रात येत असून ज्येष्ठ नेते शांताराम पोटदुखे तिचे आमंत्रक होते. परिषदेच्या कामकाजाचे निव्व्ळ अहवाल असू नयेत तर निरपेक्ष निष्कर्ष व निःपक्ष मतप्रदर्शन यांचे लेणे लेवून मसुदा तयार होईल याची काळजी घेतली जाईल याची खात्री आहे.
– मदन धनकर
भ्रमणध्वनी : 9881303414
{jcomments on}