– अरूण निगुडकर
पाकिस्तानचे अध्यक्ष झरदारी व पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांनी पाक सैन्याचे प्रमुख कयानी यांना तीन वर्षे मुदतवाढ दिल्याने पाकिस्तानच्या लोकशाहीचे अस्तित्व फार तर थोडा काळ वाढेल! कयानी हे खरेतर पाकिस्तानचे सर्वेसर्वा आहेत. भारताच्या दृष्टीने काय वा पाकिस्तानच्या जनतेच्या दृष्टीने काय, कयानी यांची छुपी लष्करशाही अधिकच बळकट
पाकिस्तानच्या जन्मापासून आजतागायत तेथे अठरा पंतप्रधान झाले. त्यांचा आढावा घेताना मला काय आढळले त्याचा आलेख मी येथे मांडतो. लष्करशहांनी त्यांचे काय केले याचा मागोवा उद्बोधक आहे. ‘अमन की आशा’चा विचार डोक्यात ठेवताना या राजकीय परिस्थितीचे भान असणे गरजेचे आहे.
- 01. लियाकत अली खान – १४ ऑगस्ट १९४७ ते १६ ऑक्टोबर १९५१ – खून
- 02. ख्वाजा नजिबुद्दीन – १७ ऑक्टोबर १९५१ ते १७ एप्रिल १९५३ – पदच्युत
- 03. महम्मद अली बोग्रा – १७ एप्रिल १९५३ ते १२ ऑगस्ट १९५५ – पदच्युत
- 04. चौधरी महम्मद अली – १२ ऑगस्ट १९५५ ते १२ सप्टेंबर १९५६
- 05. इब्राहीम इस्माइल श्रुंद्रीगर – १७ ऑक्टोबर १९५७ ते १६ डिसेंबर १९५७
- 06. हुसेन शहीद सुरावर्दी – १२ सप्टेंबर १९५६ ते १७ ऑक्टोबर १९५७
- 07. फिरोदाखान नून – १६ डिसेंबर १९५७ ते ७ ऑक्टोबर १९५८
- 08. नुरूल अमीन – ७ डिसेंबर १९७१ ते २० डिसेंबर १९७१
- 09. झुल्फिकार अली भुट्टो – १४ ऑगस्ट १९७३ ते ५ जुलै १९७७
10. महम्मद खान जुनेजो – २४ मार्च १९८५ ते २९ मे १९८८
11. बेनझीर भुत्तो – २ डिसेंबर १९८८ ते ६ ऑगस्ट १९९० – पदच्युत, पलायन
12. गुलाम मुस्तफा जतोई – ६ ऑगस्ट १९९० ते १८ एप्रिल १९९३ – काळजीवाहू पंतप्रधान
13. नवाझ शरीफ – ६ नोव्हेंबर १९९० ते १८ एप्रिल १९९३- पदच्युत, पलायन
14. बलाख शेर मझारी – १८ एप्रिल १९९३ ते २६ मे १९९३- काळजीवाहू पंतप्रधान
15. नवाझ शरीफ – २६ मे १९९३ ते १८ जुलै १९९३ – पदच्युत
16. मोझनुद्दीन कुरेशी – १८ जुलै १९९३ ते १९ ऑक्टोबर १९९३ – काळजीवाहू पंतप्रधान
17. बेनझीर भुत्तो – १९ ऑक्टोबर १९९३ ते ५ नोव्हेंबर १९९६ – राजकीय हत्या
18. मलिक मेराज खलिद – ५ नोव्हेंबर १९९६ ते १७ फेंब्रुवारी १९९७ – काळजीवाहू पंतप्रधान
पाकिस्तानच्या राजकारण्यांच्या हिशेबी तेथील जनतेला किंमत नाही. पाकिस्तान पंजाब सोडल्यास शासनाने सिंध, बलुचिस्तान, वायव्यसरहद्द प्रांत या राज्यांत शासकीय सुविधा,
शेतमजुरांचे कायद्याने संरक्षण या बाबतींत दुर्लक्ष केले. बाजारभावाचे नियंत्रण केले नाही. वीज,
पाणीवाटप, सरकारी नोक-या यांत असणारा असमतोल, यामुळे ही तिन्ही राज्ये फुटून, बांगलादेशाच्या वाटेने कधी जातील याची खात्री खुद्द पाकिस्तानी राज्यकर्ते देऊ शकत नाहीत. स्वात हा प्रांत पाकिस्तानने तालिबानला जवळजवळ देऊन टाकला आहे!
आझाद काश्मीर हा भारताचा काश्मीरमधील पाकव्याप्त भाग पाकिस्तानात राहू देण्यामध्ये चूक आहे हे जनरल थिमय्या यांनी पंडित नेहरूंच्या नजरेला १९४८ साली आणून दिले होते. परंतु पंडित नेहरू जागतिक शांततावादी होते. त्यांना हा प्रश्न जागतिक संस्थेमार्फत सुटू शकेल व हे दुखणे नाहीसे होईल असे प्रांजळपणे वाटले. त्यांनी युनोमध्ये हा प्रश्न नेला व त्या पोटी आम्ही एक राज्य गमावून बसलो.
काळ बदलला आहे. पाकिस्तानशी परत युद्ध करा असे कुणी सुजाण नागरिक म्हणणार नाही. हे खरे असले तरी पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना त्याचे महत्त्व कळले पाहिजे. मुल्लामौलवी, तालिबान, लष्कर ए तोयबा ही राजकर्त्यांचीच बाळे आहेत.
‘अमन की आशा’ सारखे प्रयोग गेल्या साठ वर्षांत अनेक वेळा झाले. अटलबिहारी वाजपेयी यांनी अमृतसर-लाहोर एक्सप्रेस सुरू केली. वाघा बॉर्डर खुली करण्याचे प्रयोग झाले. त्यातून आयएसआय ने प्रशिक्षित अतिरेक्यांची सशस्त्र निर्यात केली. शांततापथके, पत्रकारांची देवघेव, कलाकारांचे कार्यक्रम… या सर्व गोष्टी प्रभावीपणे पुढे आल्या नाहीत. काय झाले त्यांचे आजपर्यंत?
“शठं प्रतिशाठ्यमं…”. पाकिस्तानला तसेच जबरदस्त उत्तर जेव्हा भारताकडून दिले जाईल तेव्हाच या उपखंडात शांतता नांदेल. अमन की आशा काही दिवसांनी इतर उपक्रमांसारखी विस्मरणात जाईल.
– अरूण निगुडकर
arun.nigudkar@gmail.com