‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ वेबपोर्टलवर गावोगावसंबंधीचे लेखन संकलित करण्याच्या दृष्टीने अभिनव स्पर्धा योजली आहे. तीमध्ये वाचकांनीच त्यांच्या गावाबद्दल लिहावे अशी अपेक्षा आहे. ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’कडे येणाऱ्या एकून लेखांमधून तीन उत्कृष्ट लेखांची निवड करण्यात येईल. त्या लेखांना अनुक्रमे तीन हजार रुपये, दोन हजार रुपये व एक हजार रुपये असे पुरस्कार दिले जातील. त्याखेरीज जे लेख वेबपोर्टलवर प्रसिद्धीसाठी स्वीकारले जातील त्यांना प्रत्येकी पाचशे रुपयांचा पुरस्कार दिला जाईल.
‘गाव’ या संकल्पनेमध्ये मुंबईसारख्या महानगरापासून स्थायी स्वरूपाच्या वाडीवस्तीपर्यंत सर्व तऱ्हेच्या ग्राम प्रकारांचा समावेश होतो. त्यामुळे वाचकांनी त्यांच्या, त्यांना ममत्व वाटणाऱ्या गावाबद्दल लेख मोकळेपणाने हजार-बाराशे शब्दांपर्यंत लिहावा. लेखनात गावाच्या वर्णनासोबत भूगोल, इतिहास, ग्रामदेवता, गावाच्या परंपरा, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक वास्तू, तेथील मानवी कर्तबगारी आणि संस्थात्मक कामे या घटकांचा उल्लेख अवश्य असावा. नमुना म्हणून ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ वेबपोर्टलवर ‘गावगाथा’ या सदरात काही गावांची माहिती दिली आहे. ती पाहून घ्यावी. ती वर्णने आदर्श व माहितीने पुरेशी समावेशक आहेत असे मानू नये. तो केवळ नमुना आहे.
इच्छुक व्यक्तींनी त्यांचे लेख २५, सप्टेंबर २०१८ पर्यंत ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’कडे पाठवावेत. ते लेख हस्तलिखित स्वरूपात पोस्टाद्वारे किंवा संगणकावर टाईप करून इमेलने पाठवता येतील.
0-0-0-0-0-0-0-0-0-0
‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ वेबपोर्टलने गावोगावसंबंधीचे लेखन संकलित करण्याच्या दृष्टीने ‘गावगाथा – तुमच्या गावाची कहाणी तुमच्याच शब्दांत!’ ही अभिनव स्पर्धा आयोजित केली. ‘व्हिजन महाराष्ट्र’कडून ‘गावगाथा’ स्पर्धेचा निकाल २६ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात येत अाहे. तो निकाल ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे वेबपोर्टल, मोबाईल अॅप, फेसबुक पेज, फेसबुक ग्रूप, ट्विटर अकाउंट अाणि ‘थिंक’चे व्हॉट्स अॅप ग्रूप अशा माध्यमांतून जाहिर करण्यात येईल.
अाम्ही या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचे आभारी आहोत.
0-0-0-0-0-0-0-0-0-0
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कर्तबगार व्यक्ती, संस्था आणि ग्रामीण संस्कृतीचे संचित अशा तऱ्हेची माहिती २०१० सालापासून संकलित करत आहे. त्या प्रयत्नांतून ‘थिंक महाराष्ट्र’वर तीन हजारांहून अधिक लेख प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
संपर्क – ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’, 22 मनुबर मॅन्शन, पहिला मजला, 193 आंबेडकर रोड, चित्रा सिनेमासमोर, दादर (पूर्व), मुंबई 400 014
फोन : 9892611767/ 02224183710/ 02224131009
इमेल – info@thinkmaharashtra.com
Last Updated On 1st Nov 2018
गावगाथा…. !
सुंदर संकल्पना.
गावगाथा…. !
सुंदर संकल्पना.
very nice work
very nice work
Good solapur
Tourist place…
Good solapur
Tourist place cricket Tuljapur Pandharpur Gangapur
Comments are closed.