गाढविणीचे दूध

    0

         इजिप्तची राणी क्लिओपात्रा हिची शरीरकांती जगात सर्वोत्तम मानली जाते. कारण म्हणे, की ती गाढविणीच्या दुधामध्ये आंघोळ करत असे. गंमत अशी, की दोन हजार वर्षांनंतर असे संशोधन प्रसृत झाले आहे, की गाढविणीचे दूध नित्यनियमाने प्यायल्यास कंबर सडपातळ राहते. गाढविणीच्या दूधामध्ये ओमेगा-तीन आणि कॅल्शियम ही जीवनसत्त्वे उत्तम प्रमाणात असतात. शिवाय त्यामुळे हृदय तंदुरुस्त राहते आणि कार्यक्षमता दीर्घकाळ उच्च पातळीवर टिकू शकते.


         इजिप्तची राणी क्लिओपात्रा हिची शरीरकांती जगात सर्वोत्तम मानली जाते. कारण म्हणे, की ती गाढविणीच्या दुधामध्ये आंघोळ करत असे. गंमत अशी, की दोन हजार वर्षांनंतर असे संशोधन प्रसृत झाले आहे, की गाढविणीचे दूध नित्यनियमाने प्यायल्यास कंबर सडपातळ राहते. गाढविणीच्या दूधामध्ये ओमेगा-तीन आणि कॅल्शियम ही जीवनसत्त्वे उत्तम प्रमाणात असतात. शिवाय त्यामुळे हृदय तंदुरुस्त राहते आणि कार्यक्षमता दीर्घकाळ उच्च पातळीवर टिकू शकते.

         इटालियन वैज्ञानिकांनी हा शोध लावण्याच्या आधीपासून भारतीयांना गाढविणीच्या दूधाचे हे रहस्य माहीत असावे. कारण आतापर्यंत शहरातील गल्लोगलीत विक्रेते ‘गधी का दूध’ असे ओरडत गाढविण घेऊन यायचे आणि पाच दहा रूपये भावाने चमचाभर दूध विकायचे.

         गांधीजी शेळीचे दूध पित हे प्रसिध्दच आहे. राजस्थानात उंटाचे तर हिमालयीन पट्ट्यात ‘याक’चे दूध वापरतात. शेवटी, स्थानिक उपलब्धता ही महत्त्वाची. सद्यकाळात स्थानिक उपलब्धतेला जगन्मान्यतेची जोड देण्याचा प्रयत्न असतो. तसेच इटालियन वैज्ञानिकांचे हे संशोधन! (संकलित)

     गाढविणीच्‍या दूधाचा पारंपरिक व्‍यवसाय करणारे जाधव कुटुंब

    About Post Author

    Previous articleथंड गोळ्याला चेतना
    Next article‘थिंक महाराष्ट्र’: भविष्यकाळातल्या पत्रकारितेची ‘नवी तुतारी’!
    दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

    Exit mobile version