Home अवांतर टिपण अंधारातील हिरे

अंधारातील हिरे

0

–  ज्‍योती शेट्ये

  क्रिकेट, अभिनय, राजकारण अशा ग्लॅमर प्राप्‍त असलेल्‍या क्षेत्रातील व्‍यक्‍तींना प्रकाशझोतात येण्‍यासाठी जास्‍त परिश्रम घ्‍यावे लागत नाहीत. ही मेहनत त्‍या क्षेत्रांच्‍या वाट्याला येते जी ग्‍लॅमरच्‍या वेशीबाहेर उभी असतात. हा प्रकाशझोत न लाभलेल्‍या व्‍यक्‍ती अंधारातील हि-यांप्रमाणे भासतात. अशा व्‍यक्‍तींच्‍या कर्तृत्‍वाची नोंद घेण्‍यास समाज किती अनिच्‍छुक असतो याचा प्रत्‍यक्षानुभव मांडतायत ज्‍योती शेट्ये…


–  ज्‍योती शेट्ये

     अपा शेर्पा व्‍यक्‍तीने एकवीस वेळा एव्‍हरेस्‍ट शिखरावर यशस्‍वी चढाई केली या गोष्टीचे तुम्हाला आश्‍चर्य वाटते? तर मग पुढील वाक्‍य तुम्‍हाला थक्‍क करून सोडेल! दोन्‍ही पाय नसलेल्‍या एका व्‍यक्‍तीने चक्‍क एव्‍हरेसट सर केला! त्याने शिखर पादाक्रांत केले असे म्‍हणता येणार नाही, कारण त्‍याने कृत्रिम पाय बर्फात रोवत सागरमाथ्‍्यावर झेंडा लावला. त्यांचा गिरीमित्र संमेलनात सत्कार करण्यात आला. मात्र त्याबाबत फार उल्लेख कुठे वाचले नाहीत वा एकले नाहीत.

     मी मे महिन्‍यात मनालीला गेले होते. तेव्‍हा एका खासगी वाहिनीवर माझ्या भाचीची मुलाखत झाली. ती व्‍यवसायाने अभिनेत्री आहे, या संदर्भात मला अनेकांनी चांगल्‍या प्रतिक्रिया दिल्‍या. एका मैत्रिणीने तर त्याच वेळी मला फोन करून, सुरू असलेली मुलाखत फोनवर ऐकवली. राष्‍ट्रीय जलतरणपटू असलेल्‍या माझ्या दुस-या भाचीला त्‍याच महिन्‍यात महाराष्‍ट्र राज्‍य सरकारतर्फे दिला जाणारा छत्रपती पुरस्‍कार मिळाला. मात्र ही गोष्‍ट मला माझ्या जवळच्‍या एकाही नातेवाईकाने सांगितली नाही! तिची बहीण काही दिवसांपूर्वी मला भेटली, त्‍या वेळी मला ही ‘ग्रेट न्‍यूज’ समजली. या पुरस्‍कारामागे माझ्या भाचीचे आणि तिच्या वडिलांचे (माझ्या भावाचे) तिच्‍या वयाच्‍या चौथ्‍्या वर्षांपासूनचे अनंत कष्‍ट आणि परिश्रम आहेत. तिने सेकंदाच्‍या फरकाने यश संपादन केले आहे.

     ज्‍या क्षेत्रांना ग्‍लॅमर प्राप्‍त आहे, त्‍यांतील व्‍यक्‍तींचा नेहमी गाजावाजा होतो. त्‍यांची दखल घेणे किंवा त्‍यांना लोकाश्रय मिळणे हे सहज घडते. मात्र ग्‍लॅमरच्‍या वेशीबाहेरील इतर क्षेत्रांच्‍या वाट्याला उपेक्षा येते. एव्‍हरेस्‍टवर चढाई करणारी व्‍यक्‍ती किंवा तिच्यासारखी इतर प्रयत्‍नशील माणसे ही ‘कोंदण न लाभलेले हिरे’ आहेत. आपण नवे हिरे घडवत नसू तर एकवेळ ठिक, पण आहेत त्‍या हि-यांना निदान अंधारात तरी ठेवू नये.

ज्‍योती शेट्ये, 9820737301,  jyotishalaka@gmail.com

{jcomments on}

About Post Author

Previous articleसैनिकहो, तुमच्यासाठी!
Next articleकामाठीपु-यातल्‍या कथा
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

Exit mobile version