Home कला महाराष्ट्रातील जैवविविधता

महाराष्ट्रातील जैवविविधता

 

सह्याद्रीतील जैववैविध्य

राज्य समितीच्या प्रतीक्षेत!

 

महाराष्ट्रातील जैवविविधता

जैवविविधतेच्या दृष्टीने अतिमहत्त्वाच्या अशा जगभरातील चौतीस प्रदेशांमध्ये महाराष्ट्राचा, विशेषत: सह्याद्री घाटभागाचा समावेश केला जातो. राज्यातील गोदावरी, तापी, कृष्णा, नर्मदेसारख्या नद्यांची खोरी, समुद्रकिनारे, सातपुडा-अजिंठा-सह्याद्री अशा पर्वतरांगा, पाणथळ व गवताळ प्रदेशांचे विस्तृत भाग ह्यांचा ह्या संदर्भात विशेष उल्लेख केला जातो.

जैवविविधता संवर्धन करण्यासाठी केंद्रीय पातळीवर 2002मध्ये जैवविविधता कायदा पास झाला. त्यानंतर राज्याराज्यात तदर्थ मंडऴे स्थापण्यात आली, मात्र महाराष्ट्रात तशी हालचाल नाही! मंत्रिमंडळाने मंडळ स्थापण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेतला, परंतु त्याचा पाठपुरावा झालेला नाही. जैविक विविधतेचे संरक्षण करणे, जैवविविधता साधनसंपत्तीबाबत राज्य सरकारला सल्ला देण्याचे काम मंडळाकडून अपेक्षित आहे. तशा आशयाचे अधिसूचनेचे प्रारूप 2008 साली प्रसृत करण्यात आले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने जैवविविधतेचा विचार व कृती करण्यासाठी माधव गाडगीळ ह्यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्माण केली असून, तीबाबबची घोषणा गेल्या आठवड्यात झाली.

सह्याद्री घाटातील जैववैविध्य टिपण्याचा एक प्रयत्न गेली काही वर्षे बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीतर्फे चालू आहे. त्यांनी कोल्हापूर-सातारा परिसरात सरड्याच्या एक प्रजातीचा शोध लावल्याची बातमी वर्तमानपत्रांत आली. ‘ थिंक महाराष्ट्र’ने या प्रकल्पाचे प्रमुख वरद गिरी ह्यांना लेख लिहिण्याची विनंती केली. त्यांनी सादर केलेल्या मूळ इंग्रजी लेखाचे ज्योती शेट्ये ह्यांनी केलेलं हे संक्षिप्त मराठी रूप….

 

सातारा कोल्हापूर घाटभागात सरड्याच्या नव्या प्रजाती…

– वरद गिरी

 

 
“वरद, ही सरड्याची नवीन जात बघ !” माझा एक जाणकार, जिज्ञासू आणि निसर्गप्रेमी मित्र, हरिष कुलकर्णी मला म्हणाला. मी त्याला म्हटलं,हा “Cnemaspis” आहे आणि मला त्याबद्दल फारशी माहिती नाही ; माझं हे उत्तर ऎकून तो निराश झाला, कारण आम्ही ज्या “Caecilians” वर लक्ष केंद्रित केलं होतं ते “Caecilians” आम्हाला छोट्यामोठ्या दगडाखाली, पाळापाचोळ्यात, दोन दिवस खूप शोधाशोध करुनही सापडत नव्हते. आमची ही मोहीम प्रामुख्यानं पश्चिम घाटातल्या “Cnemaspis” च्या अभ्यासासाठीच्या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग होती. ह्या प्रकल्पाला ‘सफोर्ड स्माँल ग्रॅट’ चे आर्थिक पाठबळ लाभलं आहे. ह्या प्रकल्पाच्या उद्दिष्टांपैकी एक महत्त्वाचं उद्दिष्ट होतं की स्थानिकांना,  स्वयंसेवी संस्थान. Caeeilian, Reptiles आणि Anphian ह्या प्राण्यांच्या अभ्यासासाठी जरूरीचं प्रशिक्षण देणं.

प्रत्यक्ष, जंगलात कसं काम करायचं ह्याचं शिक्षण आम्ही ‘ ग्रीन गार्ड , कोल्हापूर’ ह्या संस्थेच्या कार्यकर्त्यांना देत होतो.

सुमारे पंधरा मिनिटांनी मी आणि हरिषने एक मोठा दगड हलवला आणि अजून एक “Cnemaspis” दिसला.  हा प्राणी अगोदर मिळालेल्या प्रकारापेक्षा वेगळा होता. हा चपळ होता आणि झटक्यात पालापाचोळ्यांमध्ये दिसेनासा झाला. त्याचं जवळून निरीक्षण करण्यासाठी महत्प्रयासानं आम्ही त्याला पकडला आणि असं आढळून आलं, की तो “Cnemaspis” ची पोटजात असलेला गावठी प्रकार आहे.

Cnemaspis” जातीचे सरडे लांबीला लहानमोठे असतात. ते बुटके सरडे म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे हे सरडे भारताच्या ग्रामीण भागात, खेड्यापाड्यात आढळणा-या इतर सरड्यांपेक्षा डोळ्यांच्या बाबतीत  वेगळे असतात. ह्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या ‘गोल’ असतात आणि ह्यांच्या ह्या वैशिष्ट्यामुळे काहीजण ह्यांना ‘दिवसा वावरणारे’ (Diwrnal) म्हणतात. पण मला हे मान्य नाही, कारण मी ह्यांना दिवसा आराम करुन रात्री वावरताना पाहिलं आहे. ह्याशिवाय ह्यांचे पंजे निमुळते असून पंज्यांवर थोडे उंचवटे असतात. जेव्हा मी ह्यांच्या वैज्ञानिक वर्गीकरणाचा विचार केला तेव्हा मला अमेरिकेतील व्हिलोनोवा विद्यापीठाचे विख्यात डाँ. अँरान बाऊर ह्यांची आठवण आली. ते ह्या विषयातले तज्ञ आहेत. त्यांनी मला एकदा म्हटलं होतं, की “ कोणत्याही गोष्टीची सुरुवात अगदी सूक्ष्म निरीक्षणानं करावी !” तसा माझा “Caecilians” चा अभ्यास करण्याचा उत्साह मावळला.

हरिषने तो सरडा हातात धरून ठॆवला आणि मी त्याचं अधिक तपशिलवार निरीक्षण करू लागलो. माझं कुतूहल वाढत चाललं, कारण त्या भागात आढळणा-या इतर सरड्यांपेक्षा तो खूप वेगळा होता. त्या जातीच्या सरड्यांच्या वर्गीकरणाचा मी थोडाफार, प्राथमिक म्हणता येईल असा अभ्यास केलाच होता आणि म्हणून मग जास्त खोलात जाऊन मला त्याचं निरीक्षण करणं भाग पडलं. ह्या सरड्याचं वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून निरीक्षण करताना मला अजून एक अपरिचित असं लक्षण आढळलं.त्याच्यावरचे खवल्याप्रमाणे असणारे उंचवटे इंद्रधनुष्यासारखे रंगीत दिसत होते! एका ठरावीक कोनातून हे वैशिष्ट्य जास्त ठळकपणे जाणवत होतं.

दरम्यान, आमच्याबरोबरचे आमचे इतर सहकारी म्हणजे रवींद्र आंधुरे, धनंजय जाधव व स्वप्नील पवार ह्यांना आणखी एक नमुना सापडला. मग आणखी निरीक्षणात अजून काही अशी लक्षणं आढळली, की ती नेहमी आढळणा-या “Caecilians” मध्ये सहसा दिसत नाहीत. ह्या सरड्यांमध्ये वर-वर चढण्याची क्षमता नव्हती आणि आमच्यापासून सुटका करून घेण्यासाठी तो पालापाचोळ्यात किंवा दगडाखाली जाऊ पाहात होता. ह्या सरड्याची मान इतरांच्या मानेपेक्षा जरा लांबट होती आणि लांबट व लवचीक मानेमुळे हा डोकं वळवत असताना छान कमान करत होता.

सर्व सहका-यांमध्ये  उत्साह संचारला.  तेवढ्यात फरुक मेहता व  रमण कुलकर्णी यांनी अजून दोन नमुने आणले. फरुक कोल्हापूर जिल्ह्यातल्या वनांचा प्रचंड अभ्यास असलेला निस्रर्गज्ञानी आहे. ह्यांच्यापैकी कोणताही सरडा झाडावर किंवा मोठ्या दगडावर चढून जाताना आढळला नाही. प्रत्येक सरड्यावर रंगांच चमकणं चालू होतं आणि प्रत्येकजण जमिनीवर सरकत जाताना जमिनीच्या दिशेनं खालीवर जिभेनं फलकारत होता. ह्याची प्रत्येक गोष्ट अगदी खास होती, ‘वेगळी’ही होती.

एक प्रश्न राहिलाच होता की ह्यांची जात कोणती आहे? जरी मी “Caecilians” च्या कामात खूप गुंतलो होतो, तरी हा सरडा मनातून जात नव्हता. मी बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये जमवलेल्या सर्व नमुन्यांबरोबर त्याची तुलना करून बघितली, पण कुठेही साम्य आढळलं नाही. नेहमीप्रमाणे, मी वैज्ञानिक वर्गीकरणाची विस्तृत माहिती आणि सर्व छायाचित्रं डॉ. अँरान बाऊर ह्यांना ईमेल केली डॉ. अँरान म्हणजे सरड्यांच्या अभ्यासातले तज्ञ आणि माझ्या संशोधनात मदत करणारे अनुभवी सल्लागार व मार्गदर्शक.  डॉ. अँराऩ ह्यांचं मला आलेलं उत्तर माझा उत्साह द्विगुणित करणारं होतं. त्यानी कळवलं होतं, की हा सरडा विशेषच वाटतो !

क्षमता गायकवाड ही आमच्या ग्रूपमध्ये 2007 साली सामील झाली. क्षमता बॉंबे नॅचरल हिस्टरी सोसायटीमध्ये संशोधन सहाय्यक आहे. क्षमता मला निरीक्षण वगैरे करण्यास मदत करत होती आणि मदत करताना, ती मला सतत प्रश्न विचारत असे. ह्या सर्व कामाची परिणती अजून चांगली निरीक्षणं आणि परीक्षणं करण्यात झाली. ह्या सरड्यांवर खवल्यांसारखे उंचवटे सर्वांना सारखे होते, पण फुगवटे गाठीसारखे नव्हते आणि सर्वात जास्त लक्षवेधक गोष्ट होती, ती series of precloacal femoral pores. ह्या सर्व गोष्टींवर आणि निरीक्षणांवर आधारित, आम्ही एक नवीन संशोधनपर निबंध लिहायला सुरुवात केली. मी त्याच भागाला  एका पाठोपाठ एक अशा अनेक भेटी दिल्या, पण कधीही ते सरडे मला परत सापडले नाहीत. मात्र पुढच्याच पावसाळ्यात गेलेल्या रवींद्र आणि हरिष ह्यांना त्या भागात परत एकदा हेच सरडे दिसले आणि म्हणून आम्ही ह्या निष्कर्षाप्रत आलो, की हे सरडे बहुधा पावसाळ्यात दिसत असावेत.

आमच्या पुढच्या भेटीत स्वप्निलला अजून एक विशेष गोष्ट आढळून आली. ती ही की ह्या सरड्यांची पिल्ले ही मोठ्या सरड्यांपेक्षा वेगळ्या रंगाची असतात. त्यानं काही चांगली छायाचित्रं काढली. आम्ही सर्व माहितीचं संकलन करून, त्या हस्तलिखिताची एक प्रत डॉ. अँरान ह्यांना त्यांच्या टिका /टिप्पणीसाठी पाठवली. एक प्रत Journal Zootaxa साठी सादर केली. अलिकडेच तत्संबंधी एक पेपर प्रसिद्ध झाला आणि एक नवीन जात, “Cnemspis kolhapurensis” ह्या नावानं भारतीय सरपटणा-या प्राण्यांच्या नावांच्या यादीत प्रविष्ट झाली! ह्या भागातल्या वनांची अद्वितीयता अधोरेखित करण्यासाठी आम्ही त्यास कोल्हापूर जिल्ह्याचं नाव दिलं.

मला पश्चिम घाटाचं पूर्वीपासून खूप आकर्षण आहे. माझं आकर्षण प्रत्येक भेटीबरोबर वाढत गेले आहे. माझ्या विचारांवर पूर्वी ‘सौदर्यदृष्टीचा’ प्रभाव होता. “मला इथलं सौदर्य खूप भावलं होतं”. पण आता दहा वर्षांच्या काळात ह्या भागात केलेल्या कामामुळे इथल्या ‘जैविक मूल्यांचा’ माझ्यावरचा प्रभाव वाढला आहे. हा भाग सरपटणारे प्राणी आणि जलचर ह्यांच्या राहण्यासाठी योग्य आहे. पैकी खूप प्राणी इथे आढळतात आणि बरेच काही अजून शोधले गेले नाहीत. मागच्या दशकात पश्चिम घाटातल्या Reptiles आणि Amphibians च्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. इथं अभ्यास आणि संशोधन खूप व्हायला हवं. अशा प्रकारे आम्ही महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटातल्या प्राणिजीवनाच्या अभ्यासाचं दस्ताऐवजीकरण सुरू केलं.सात वर्षांच्या ह्या भागातल्या वनांच्या प्राणिजीवनाच्या अभ्यासानंतर आम्ही Caecilians च्या दोन नवीन जातींचा शोध लावला. त्यांची नावं Gegeneophis daniei आणि Indotyphlus maharashrasensis . ह्या बरोबरच ह्या भागात आम्ही दोन नवीन प्रजाती शोधून काढल्या. त्या म्हणजे 1. Hemidactylus aarobauer आणि Hemidaetylus satapraensis.

नवीन जातीचा शोध हा माणसांच्या वस्तीपासून जवळ आणि सहज जाऊ शकू अशा भागात लागला आहे. अजून खूप प्राणिजीवन दूरवर व खोलवर असणार. danieli ही प्रजात सिधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या जंगलात आढळणारी म्हणून ओळखली जाते. दुसरी Cacilian Indotyphlus Maharashtraensis ही प्रजात प्रामुख्याने सातारा जिल्ह्याच्या काही पठारी भागात आढळते. Hemidactylus Sataraensis ही जात मात्र फक्त सातारा जिल्ह्यात पठारी भागात आढळते आणि ते प्राणी जमिनीवर वस्ती करणारे असतात.

 

About Post Author

Previous articleजेजुरी
Next articleयंग इंडियन – इर्फाना मुजावर
ज्योती शेट्ये या डोंबिवलीच्‍या राहणा-या. त्‍यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टमधील नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्‍यानंतर त्‍या ‘वनवासी कल्‍याणाश्रम‘ या संस्‍थेत काम करू लागल्या. ईशान्‍य भारतातील वनवासी समाजात जाऊन राहणे, त्‍यांच्‍यासाठी काम करणे, तेथील मुलांना शिकवणे हा त्‍यांच्‍या आयुष्‍याचा भाग होऊन गेला आहे. त्‍यांनी ईशान्‍य भारतातील अनुभवांवर आधारित ‘ओढ ईशान्‍येची‘ हे पुस्‍तक लिहिले आहे. त्या सध्या अंदमानात कार्य करत आहेत.

1 COMMENT

Comments are closed.

Exit mobile version