Home व्यक्ती त्रेपन्नावे साहित्य संमेलन (Fifty-third Marathi Literary Meet – 1979)

त्रेपन्नावे साहित्य संमेलन (Fifty-third Marathi Literary Meet – 1979)

त्रेपन्नावे मराठी साहित्य संमेलन चंद्रपूर येथे 1979 साली आयोजित करण्यात आले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष वामन कृष्ण चोरघडे हे होते. ते विशेषतः लघुकथा लेखनासाठी प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील नरखेड या गावी 16 जुलै 1914 रोजी झाला. त्यांनी नागपूर विद्यापीठातून मराठी व अर्थशास्त्र या विषयांत पदवी मिळवली. प्राध्यापक व प्राचार्य म्हणून शिक्षणक्षेत्रात कार्य केले.

चोरघडे यांना एम ए झाल्यावर वर्ध्याला शिक्षकाची नोकरी मिळाली. त्यावेळी त्यांनी गांधीजींच्या आवाहनाला साद देऊन स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या सुमारास त्यांना बंदिवासातून मुक्ती मिळाली. त्यानंतर ते गांधी विचारांवर स्थापन झालेल्या वर्ध्याच्या गोविंदराम सक्सेरिया वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झालेते त्याच कॉलेजच्या नागपूर शाखेमध्ये उपप्राचार्य 1949 साली झाले आणि तेथूनच चोरघडे प्राचार्य म्हणून 1974 साली निवृत्त झाले. चोरघडे हे दोन वर्षे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे अध्यक्ष होते. महाराष्ट्राचे मंत्री रामकृष्ण पाटील यांनी चोरघडे यांना मानद अन्नपुरवठा अधिकारी हे पद दिले होते. पुढे त्यांनी काँगेसप्रणीत भारतसेवक समाजाच्या नागपूर शाखेची जबाबदारी सांभाळली. चोरघडे यांनी त्यावेळी विविध शिक्षणसंस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने श्रमसंस्कार पथक स्थापन केले होते.

चोरघडे यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला आणि दोन वेळा कारावासही भोगला. ते गांधीवादी कार्यकर्ते होते. त्यांनी आयुष्यभर खादीचे पालन केले. चोरघडे यांनी वेणू साठे यांच्याशी विवाह केला. त्यांचे चिरंजीव श्रीकांत चोरघडे हे बालरोगतज्ज्ञ व बालमानसशास्त्रज्ञ आहेत.

चोरघडे यांच्या लेखनाची सुरुवात 1930 च्या दशकात झाली. त्यांनी पहिली लघुकथा, अम्मा’ 1932 मध्ये लिहिली. त्यांच्या कथा वागीश्वरीमौजसत्यकथा या नियतकालिकांमधून प्रसिद्ध होत गेल्या. त्यांच्या लेखनातून मराठी लघुकथेचा एक स्वतंत्र, विचारप्रवृत्त आणि सशक्त प्रवाह तयार झाला. वामन चोरघडे यांच्या लेखनावर भरपूर समीक्षात्मक लेखन झाले आहे. विशेषतत्यांच्या कथानायिकांवर आधारित काही संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे सुषमा’, ‘हवन’, ‘यौवन’, ‘प्रस्थान’, ‘पाथेय’, संस्कार’, ‘नागवेल’, ‘साद’ असे कथासंग्रह आहेत. वामन चोरघडे यांनी लघुकथाललित लेखचरित्रेशैक्षणिक प्रबंध आणि शैक्षणिक पाठ्यपुस्तके अशा प्रकारांचे लेखन केले. त्यांच्या निवडक कथांचे संग्रह वामन चोरघडे यांच्या निवडक कथा भाग – 1आणि भाग – 2’ या स्वरूपात प्रसिद्ध झाले आहेत. त्याचे संपादन आशा बगे आणि श्रीकांत चोरघडे यांनी केले आहे. त्यांच्या कथांमध्ये ग्रामीण जीवनस्त्रियांचे प्रश्न, सामाजिक अन्यायआर्थिक विषमतागांधीवादी तत्त्वज्ञान यांसारखे विषय प्रभावीपणे हाताळलेले दिसतात. त्यांच्या लेखनात सच्ची मानवी भावना आणि सरळ भाषाशैली आहे. त्यांनी लेखनाबरोबर नट आणि दिग्दर्शक म्हणून रंगभूमीसाठीही काम केले.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून चोरघडे म्हणालेकी मी काही वर्षांपूर्वी असे विधान केले होते की आज वाचकवर्ग वाढला पण अभिरुची वाढली नाही.’ आज दुर्दैवाने मला दुसरे विधान करावे लागते आणि ते म्हणजे आज अभिरुची तर जाऊ द्या पण मासिकांच्या संख्येत वाढ झाली, वृत्तपत्रे उदंड निघू लागली. लेखक तर लोकसंख्येच्या अनुपानापेक्षाही अधिक वाढले. प्रकाशकांची संख्या वाढली, पण ज्याच्यासाठी हा सगळा आटापिटा करायचा तो वाचकवर्गच कमी झाला आहे. आणि सगळीकडे अर्थशास्त्रातील बाजारनफा-तोटा आणि त्या अनुषंगाने साहित्यसेवासरकारतर्फे अनुदानेबक्षिसेप्रौढ शिक्षणाच्या धडक मोहिमा हे सुरू झाले आहे. परंतु हा आटापिटा ज्या ध्येयासाठी आपण करत असतो ते ध्येय म्हणजे वाचनाची अभिरुची वाढवणे. तेच उन्हाळ्यातील ओढ्यागत आटले आहे. माझ्या पिढीपर्यंत वाचणेसांगणेभाषण देणे या गोष्टींना प्रतिष्ठा होती. आता वेगळ्याच गोष्टींना प्रतिष्ठा लाभली आहे.

माझे एक स्वप्न आहे की विद्यापीठाच्या क्षेत्रातील सर्व विषयांत मराठी माध्यम सुरू व्हावे. इतर सुधारलेल्या देशांत सर्व प्रकारचे ज्ञान त्यांच्या भाषेत देता येते. फक्त भारतालाच देता येत नाही. मातृभाषा म्हणजे आईची भाषा ! पण ही आईच आता मदरकिंवा ममीहोऊन गेल्यामुळे तिला प्रतिष्ठा द्यावीतिच्या आचारविचारांना प्रतिष्ठा लाभावी असे वाटतच नाही. मातृभाषा ही शिक्षणाची मातृभाषा झाल्याशिवाय भारतीय माणूस स्वतंत्र विचार करूच शकत नाही. महाराष्ट्रात सर्व विषयांत मातृभाषा’ माध्यम झाले पाहिजे असे मी तुम्हा सर्वांच्या अंतरात्म्याला आवाहन करतो.

त्यांचे निधन 1 डिसेंबर 1995 रोजी झाले.

– टीम थिंक महाराष्ट्र

About Post Author

2 COMMENTS

  1. आत्ताच वा. कृ. चोरघडे यांच्याविषयीचा लेख आला. आमच्या पुस्तकात त्यांचा धडा होता. बहुधा नववीच्या पुस्तकात असेल. विदर्भातील तरुण नोकरीस लागतो आणि पहिल्या पगाराचे पैसे वडिलांच्या पायाशी ठेवतो. त्यांच्या डोळ्यांतून कृतार्थतेचे अश्रू ओघळतात. ते खारट थेंब असं वर्णन चोरघड्यांनी केलंय. मुलगा वडिलांच्या पायावर डोकं ठेवतो असं चित्र होतं. तो धडा शिकल्याला पन्नास वर्षं होत आली, आजही पुस्तकातलं ते चित्र नि ते शब्द स्मरतात.

  2. असा सुवर्ण काळ होता जेव्हा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असायचे असे रथी महारथी..त्यांचे लेखनही उच्च दर्जाचे,स्व:ताचे, स्वयंभू, जगरहाटी च्या भट्टीत तावून सुलाखून निघालेले सोन्यासारखे होते..
    आजची अवस्था तर बोलायलाच नको.. अगदी हास्यास्पद होतात साहित्य संमेलने..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version