Home अवांतर टिपण हे तर सरकारचे विकृत धोरण!

हे तर सरकारचे विकृत धोरण!

     सरकारने गेल्‍या पाच-सात वर्षांत मराठी शाळांना परवानगी दिलेलीच नाही. त्यासाठी आम्‍ही ‘मराठी शाळा टिकू द्या, मराठीतून शिकू द्या’ अशी चळवळही केली.


रमेश पानसे    

     सरकारने गेल्‍या पाच-सात वर्षांत मराठी शाळांना परवानगी दिलेलीच नाही. त्यासाठी आम्‍ही ‘मराठी शाळा टिकू द्या, मराठीतून शिकू द्या’ अशी चळवळही केली. त्‍यानंतर उपोषणाचा मार्ग अवलंबला. मग सरकारकडून विनाअनुदानित मराठी शाळांसाठी कायदा करण्‍याचे आश्‍वासन देण्‍यात आले. या पार्श्‍वभूमीवर आजची बातमी वाचली आणि हादरून गेलो.

     खासगी मराठी शाळा बंद करणे, मात्र भिकार अवस्‍थेतील शासकीय मराठी शाळा आणि इंग्रजी शाळा टिकवणे असे सरकारचे विकृत धोरण आहे. सरकार एकवीसशे इंग्रजी शाळांना परवानगी देण्‍याचा विचार करत आहे. मात्र इंग्रजी शाळांच्‍या दर्जाबद्दल विलक्षण शंका आहेत. खेडोपाडी इंग्रजी शाळा खोट्या पद्धतीने चालवल्‍या जातात. त्यामुळे मराठीतून शिकायचे तर शासकीय शाळांमधून वाईट शिक्षण घेऊन शिकण्‍याचा पर्याय विद्यार्थ्‍यांसमोर ठेवण्‍यात आला आहे. मराठी शाळा उत्‍तम दर्जाच्‍या असणे आणि त्‍यात शिकणा-या मुलांना इंग्रजीचे उत्‍तम ज्ञान असणे आवश्‍यक आहे, याकडे कटाक्ष असला पाहिजे.

     ‘लोकसत्‍ते’ने याबद्दल एकांगी भूमिका घेतलेली आढळली. त्‍यांच्‍या सांगण्‍यानुसार, जर मुले इंग्रजी माध्‍यमात शिकली तर मराठीची पताका जगभरात फडकेल. मात्र मातृभाषेत शिक्षण घेऊन इंग्रजी येत असलेली मुले प्रामुख्‍याने कर्तृत्‍व गाजवतात असे दिसून येते. मराठी शाळा बंद करून इंग्रजी शाळा सुरू करण्‍याच्‍या सरकारच्‍या या विकृत धोरणाविरूद्ध आम्‍हाला पुन्‍हा एकदा चळवळ करावी लागेल, असे वाटते.

रमेश पानसे
ज्‍येष्‍ठ शिक्षणतज्ञ

दिनांक – 25.05.2011

{jcomments on}

About Post Author

Previous articleमराठी शाळा टिकवायच्या कशा?
Next articleकुटुंब रंगलंय नेत्रदानात!
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

Exit mobile version