– विलास सोनावणे
जागतिकीकरणाचा फोलपणा अण्णांच्या घटनेतून सामोरा येतो. जागतिकीकरणामुळे भांडवलदारांचे चारित्र्य बदलले. त्याने भ्रष्टाचाराला स्कोप दिला. केतकर म्हणाल्याप्रमाणे अण्णांच्या या आंदोलनामुळे लोकशाही धोक्यात येणार आहे. मात्र या आंदोलनाने भ्रष्टाचाराचा मुद्दा निकालातही निघणार नाही. भ्रष्टाचार हे भांडवलशाहीचे अभिन्न अंग आहे. त्याशिवाय धनसंचय होऊ शकणार नाही. भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रथमच निर्माण झालेला नाही. व्ही. पी. सिंग वगैरे मंडळींनी हा मुद्दा समोर आणलाच होता. टूजी स्कॅम असोत, वा हर्षद मेहता प्रकरण, या सर्व प्रकरणांतूनही हा मुद्दा वारंवार समोर आला आहे. यापूर्वी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सरकारे कोसळली, मात्र त्यावेळी कुणी संविधानाला हात घातलेला नव्हता.
– विलास सोनावणे
कुमार केतकर आणि दिनकर गांगल यांनी क्रूर जागतिकीकरणाच्या बाजूने ज्या भूमिका घेतल्या, त्या मला नेहमीच खटकत राहिल्या. मी आणि केतकर यांनी एकत्रितपणे गिरण्यांच्या गेटवर गिरणी कामगारांच्या सभा घेतलेल्या आहेत. अचानक, त्यांनी हे सगळे सोडून जागतिकीकरणाच्या बाजूची भूमिका घेणे मला बोचणारे ठरले.
जागतिकीकरणाचा फोलपणा अण्णांच्या घटनेतून सामोरा येतो. जागतिकीकरणामुळे भांडवलदारांचे चारित्र्य बदलले. त्याने भ्रष्टाचाराला स्कोप दिला. केतकर म्हणाल्याप्रमाणे अण्णांच्या या आंदोलनामुळे लोकशाही धोक्यात येणार आहे. मात्र या आंदोलनाने भ्रष्टाचाराचा मुद्दा निकालातही निघणार नाही. भ्रष्टाचार हे भांडवलशाहीचे अभिन्न अंग आहे. त्याशिवाय धनसंचय होऊ शकणार नाही. तसेच, भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रथमच निर्माण झालेला नाही. व्ही. पी. सिंग वगैरे मंडळींनी हा मुद्दा समोर आणलाच होता. त्यातच नुकतेच झालेले टूजी स्कॅम असोत, वा हर्षद मेहता प्रकरण, या सर्व प्रकरणांतूनही हा मुद्दा वारंवार समोर आला आहे. यापूर्वी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सरकारे कोसळली, मात्र त्यावेळी कुणी संविधानाला हात घातलेला नव्हता.
शेवटी, हा भ्रष्टाचार कुठे जाऊन थांबणार? भ्रष्टाचार म्हणजे केवळ पैसे खाणे नव्हे. माणसाला माणसाच्या बरोबरीने जगण्याचे अधिकार नाकारणे हा सर्वांत मोठा भ्रष्टाचार आहे. तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे धनाची आसक्ती हा मोठा भ्रष्टाचार आहे. देशातील कष्टकरी, कामगार, स्त्रिया, दलित या सर्वांवर होणारे अन्याय अण्णांना दिसत नाहीत का? या निकषावर अण्णांसोबत जी माणसे आहेत त्यांच्या भूमिका काय आहेत? मी प्रचंड अस्वस्थ आहे, कारण वरवर गोंडस दिसणारा भ्रष्टाचार निर्मूलनाचा हा मुद्दा देशातील तळागाळातील वर्गांच्या विरोधात जाणार आहे. कारण या वर्गाच्या हाती केवळ एक हत्यार उरले आहे आणि ते म्हणजे संविधान आणि अण्णांचा हल्ला संविधानावरच आहे! या संविधानाने न्यायव्यवस्था आणि संसदेत समतोल राखला आहे. अण्णांच्या आंदोलनाचा रोख समतोलाला बायपास करून नवीन असंविधानिक व्यवस्था निर्माण करण्याकडे दिसतो.
केतकर, गांगलांसारख्या आमच्या मित्रांनी या परिस्थितीला त्यांच्या जागतिकीकरणाच्या बाजूने घेतलेल्या भूमिका जबाबदार होत्या, हे प्रांजळपणाने कबूल करावे.
विलास सोनावणे, मुस्लिम ओबीसी चळवळीचे प्रणेते, भ्रमणध्वनी:9422520574, vilassonawane@hotmail.com
दिनांक : 17-08-2011
{jcomments on}