‘मिड डे’चे पत्रकार जे.डे यांच्या हत्याप्रकरणानंतर मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद चालू होती. जे.डे यांची हत्या, पत्रकारांवर होणारे हल्ले हे मुद्दे चर्चिले जात होते. गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी होत होती. मात्र राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात येत होता. माझा मोबाईल सायलेण्ट मोडवर असल्याने मला आईचे आलेले फोन समजले नाहीत.
– विजय गायकवाड
‘मिड डे’चे पत्रकार जे.डे यांच्या हत्याप्रकरणानंतर मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद चालू होती. जे.डे यांची हत्या, पत्रकारांवर होणारे हल्ले हे मुद्दे चर्चिले जात होते. गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी होत होती. मात्र राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात येत होता. माझा मोबाईल सायलेण्ट मोडवर असल्याने मला आईचे आलेले फोन समजले नाहीत. बाहेर आल्यानंतर, मी तिला परत फोन केला आणि कळाले, की अहमदनगरमधील माझ्या गावातील शेतावर लावलेल्या मोटारी कुणीतरी चोरून नेल्या होत्या. पोलिसात तक्रार वगैरे सोपस्कार झाले. मात्र हाती काहीच लागले नाही! इकडे मुख्यमंत्री माझ्यासमोर छातीठोकपणे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आलबेल असल्याचे सांगत होते आणि त्याच क्षणी मला त्या व्यवस्थेचा ढिसाळपणा भोगावा लागत होता. काय हा विरोधाभास!
– विजय गायकवाड अॅग्रोवन सकाळ, प्रतिनिधी मुंबई, इमेल –vijay.agrowon@gmail.com भ्रमणध्वनी – 9870447750
दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.
गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्यासारख्या व्यक्तींच्या साथीने ‘ग्रंथाली’ची स्थापना केली. ती पुढे महाराष्ट्रातील वाचक चळवळ म्हणून फोफावली. त्यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्तके त्यांनी संपादित केली. त्यांनी संपादित केलेल्या मासिके-साप्ताहिके यांमध्ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्थापक सदस्य आहेत.
साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्क्रीन इज द वर्ल्ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्कार, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ व ‘मराठा साहित्य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार लाभले आहेत.