खानदेशात, अमळनेरला संध्याकाळी नदीच्या वाळवंटात सभा होती. सभा संपताक्षणी फौजदाराने गुरुजींना अटक केली. 17 मे 1930 पासून गुरूजींचा कारावास …
साने गुरुजी
- 10 मे 1947 रोजी पंढरपूर येथे हरिजनांना मंदिरप्रवेश मिळावा म्हणून प्राणांतिक उपोषणास सुरुवात. दादासाहेब मावळंकर यांच्या मध्यर्स्थाने अकरा दिवसांनंतर विठ्ठलमंदिर हरिजनांसाठी खुले झाले.
- वाड्मय:- ‘साधना’ नावाचे साप्ताहिक 15 ऑगस्ट 1948 रोजी सुरू केले. त्यात सुंदर सुंदर पत्रे लिहून लोकांनी मार्गदर्शन केले.
- नाशिकच्या तुरुंगात ‘श्यामची आई’ हे पुस्तक 1932 साली लिहिले. त्यांनी 9 फेब्रुवारी 1932 ते 13 फेब्रुवारी 1932 या अवघ्या पाच दिवसात पुस्तक लिहिले.
- 1934-36 या काळात ‘स्त्रीजीवन’ नावाचे ओवीबध्द पुस्तक लिहिले.
- स्वातंत्र्य चळवळीला पैसा मिळावा म्हणून ‘गोड गोष्टी’ या पुस्तकाचे दहा भाग 1940-45 या काळात लिहिले.
- त्यांनी 1920 ते 1925 या काळात. नामदार गोखले, इतिहासाचार्य राजवाडे, ईश्वरचंद्र विद्यासागर आणि शिशिरकुमार घोष इत्यादी चरित्रलेखन केले.
- अमळनेरची बंद केलेली प्रताप मिल सुरू करावी व कामगारांची उपासमार टळावी म्हणून साने गुरूजींनी 1939 साली तापी नदीत जिवंत समाधी घेण्याची प्रतिज्ञा केली. तत्कालीन मुख़्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या मध्यस्थीने मिल सुरू झाली.
रिकामा जाऊ न देई एकही क्षण :-
- खानदेशात, अमळनेरला संध्याकाळी नदीच्या वाळवंटात सभा होती. सभा संपताक्षणी फौजदाराने गुरुजींना अटक केली. 17 मे 1930 पासून गुरूजींचा कारावास सुरू झाला तो 23 मार्च 1931 रोजी त्यांची सुटका झाली. कारावासाचा हा काळ गुरुजींनी स्वत:बरोबर देशवासियांसाठी अविस्मरणीय केला. तुरुंगात गुरुजी सत्याग्रही मुलांना गोष्टी सांगत. नवा विचार देत. धुळ्याच्या तुरुंगात गुरूजींना दोन-अडीच महिने ठेवले होते. नंतर त्यांना त्रिचनापल्लीच्या तुरुंगात हलवण्यात आले. त्रिचनापल्लीचा सेंट्रल जेल हा दक्षिण भारतातील मोठा तुरुंग. केरळ, तामिळनाडू, आंध्र, कर्नाटक, बंगाल व महाराष्ट्र अशा विविध राज्यांतील सत्याग्रही या तुरुंगात होते. त्यामुळे गुरुजींच्या कानावर विविध भाषा पडू लागल्या. गुरुजींच्या हृदयाला भारतातील भाषांचा हा कोलाज स्पर्शून गेला. गुरुजी कन्नड, तामिळ भाषांचे धडे गिरवू लागले. पुढे, गुरुजींनी ‘बेबी सरोजा’ ही तमिळ भाषेतील गोष्ट अनुवाद करून आपल्या ‘गोड गोष्टी’ या पुस्तकात समाविष्ट केली. तसेच व्हिक्टर ह्यूगो या फ्रेंच कादंबरीकाराच्या, ‘ला मिझराबल’ वर आधारित ‘दु:खी’ नावाची गोष्ट लिहिली. तमिळ वाडःमयात ‘तिरुवल्लुवर’ या तमिळ पंडितांचा ‘कुरल’ हा ग्रंथ ‘तमिळ वेद’ म्हणून प्रसिध्द आहे. त्याचा अनुवाद गुरुजींनी याच तुरुंगात केला. शिवाय, अनेक कविता, नाटके, निबंधही लिहिले. आचार्य भागवत त्यांच्या बरोबर तिथे होते. पुढे, आचार्यांनी गुरुजींच्या ‘पत्री’ नामक काव्यसंग्रहाला सुंदर प्रस्तावना लिहिली.
ही मोठी माणसे देशासाठी तुरुंगात गेली. त्यांनी कारावासही एक क्षण फुकट न घालवता सार्थकी लावला.
संदर्भ :- ‘अमृतपुत्र साने गुरुजी’ लेखक :– राजा मंगळवेढेकर
दिनांक – 31.05.2011
{jcomments on}