Home अवांतर टिपण भ्रष्टाचाराविरूध्द बोलणा-यांकडे नैतिक पायाचा अभाव

भ्रष्टाचाराविरूध्द बोलणा-यांकडे नैतिक पायाचा अभाव

0

राजकारणात नैतिकतेचा सुप्त प्रवाह असावा लागतो. सध्या तो नष्ट होत चाललेला दिसतो. अशा वेळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी हजारेंच्या आंदोलनाला पत्राद्वारे जो पाठिंबा दिला आहे, त्याचे स्वागत करावेसे वाटते.

सत्याग्रहींची निवड करताना महात्मा गांधी फार काटेकोर असत. त्याच्या नैतिकतेविषयी कुणालाही संशय नसावा, असा त्यांचा कटाक्ष असे. म्हणूनच त्यांनी विनोबा भावे यांची ‘पहिला सत्याग्रही’ म्हणून निवड केली होती. लोकपाल समितीवर नियुक्त्त करण्यात आलेल्या शांतीभूषण-प्रशांतभूषण यांच्याबाबतीत जो वाद निर्माण झाला. त्यातून या दोघांच्या नैतिकतेबद्द्ल काहीच खात्री देता येत नाही. आजची परिस्थिती अशी आहे की, जी व्यक्त्ती इतरांचे भ्रष्टाचाराचे बिंग फोडते, ती स्वत:देखील भ्रष्टाचारात लडबडलेली असल्याचे समजते. त्यामुळे भ्रष्टाचाराविरूध्द बोलण्यासाठी जो नैतिकतेचा पाया लागतो, तो आज कुणाकडेच नसल्याचे जाणवते. यातून भविष्यात नैतिकतेच्या आधारावर आंदोलने उभी रहातील का? हा प्रश्नही निर्माण होतो. आज प्रत्येकालाच परस्परांच्या नैतिकतेवर संशय आहे आणि अशा स्थितीत असलेल्‍या समाजाला कुणीच वाचवू शकत नाही. त्यामुळे आज समाज आणि राजकारणातला नैतिक पाया अधिक बळकट करण्याची आवश्यकता भासत आहे.

 

– शरद देशपांडे
पुणे विद्यापिठ,
निवृत्त तत्त्वज्ञान विभागप्रमुख

दिनांक – 21/04/2011

{jcomments on}

About Post Author

Previous articleनिलारजेपणाचा कळस
Next articleखाणकामगारांची चिंता शासनाला, ना खाणमालकांना!
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

Exit mobile version