पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील तब्बल हजार दरवाजे असलेला राजवाडा एकेचाळीस एकर जागेवर बांधलेला आहे. म्युझियममध्ये रूपांतर केलेल्या त्या राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये ऐंशी फूट उंच घुमटातून लटकणारे शहाण्णव दिव्यांचे प्रचंड झुंबर व पर्यटकांचे प्रतिबिंब पर्यटकाला न दिसता राजवाड्यातून दुसर्या ठिकाणच्या व्यक्तीला दिसेल असा गंमतीदार (जादूचाच) आरसा आहे. त्या राजवाड्याची माहिती.
प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्यांनी गणिताच्या आवडीने राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्करली. ते बँकेतून वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते ‘थिंक महाराष्ट्र’ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. ‘थिंक’च्या ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ या मोहिमेमध्ये त्यांचा सहभाग होता.
लेखकाचा दूरध्वनी
9920202889 (022) 26832164