- 1-7-2011 – लोकसत्ता – पान क्र. 1 – ‘‘नीरज ग्रोव्हर हत्याकांड प्रकरणात जेरोमला न्यायालयाने सदोष मनुष्यवधासाठी (खरं म्हणजे ‘हत्ये’साठी!) दहा वर्षे सक्तमजुरी आणि दोन गुन्ह्यांसाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा दंड सुनावला. तर नीरजच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याबद्दल मारियाला तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.’’
- 3-7-2011 – टाइम्स ऑफ इंडिया – पान क्र. 1 – ‘‘… जनावरांशी क्रूरपणे वागणा-यांना एक …..
- 1) 1-7-2011 – लोकसत्ता – पान क्र. 1 – ‘‘नीरज ग्रोव्हर हत्याकांड प्रकरणात जेरोमला न्यायालयाने सदोष मनुष्यवधासाठी (खरं म्हणजे ‘हत्ये’साठी!) दहा वर्षे सक्तमजुरी आणि दोन गुन्ह्यांसाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा दंड सुनावला. तर नीरजच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याबद्दल मारियाला तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.’’
- 2) 3-7-2011 – टाइम्स ऑफ इंडिया – पान क्र. 1 – ‘‘… जनावरांशी क्रूरपणे वागणा-यांना एक कोटी रुपयांपर्यंतचा दंड किंवा पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाईल, लोकसभेत लवकरच सादर होणारे नवे बिल!’’
लागोपाठ आलेल्या या दोन बातम्या. मानवहत्येबद्दल आणि मृतदेहाचे शंभराहून अधिक तुकडे केल्याबद्दल झालेली शिक्षा, तीन आणि दहा वर्षे आणि दंड पन्नास हजार ते एक लाख रुपये. मात्र जनावरांशी क्रूरपणे वागण्याबद्दल होऊ शकणारी सजा पाच वर्षे किंवा दंड एक कोटी रुपये. काय वाटते या दोन बातम्या एकत्र वाचून? कायदे करणारी माणसे आणि न्याय करणारीही माणसेच! माणसाच्या दृष्टीने माणसाची किंमत जनावरांच्या तुलनेत किती कमी असावी, निदान आपल्याकडे तरी, याचे हे उत्तम उदाहरण! …की जनावरप्रेमाचा अतिरेक?
जाता जाता… वर्षानुवर्षे ज्या माणसांना जनावरांसारखे वागवले जाते, त्या माणसांच्या हत्येनंतर तरी त्यांची किंमत या नव्या कायद्यामुळे वाढेल का?
जयंत धर्माधिकारी – भ्रमणध्वनी – 9820039694, इमेल- suhita.thatte@gmail.com
{jcomments on}