Member for

10 months

मनोहर बाळकृष्ण कुलकर्णी ऊर्फ ‘मबा’ यांचे निधन २०१४ साली झाले. ते वेदवाङ्मयाचे व संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. त्यांचे अध्ययन, अध्यापन, प्राचीन व अर्वाचीन संस्कृतीची सांगड घालणारी विचारसूत्रे सर्वांपुढे मांडणे सतत चालू असे. त्यांनी मराठी व संस्कृत भाषेचे अध्यापन रत्नागिरी येथील गोगटे महाविद्यालयात सुमारे बत्तीस वर्षे केले. त्यांनी लिहिलेले, मेहता पब्लिकेशनने २०११मध्ये प्रकाशित केलेले ‘मबां’चे ‘शब्दचर्चा’ हे पुस्तक गाजले. त्यात सुमारे एक हजार शब्दांचे अर्थ स्पष्टीकरणासहित दिले आहेत.