Member for

7 years 1 month

नंदिनी बर्वे यांनी शिक्षिका म्हणून नोकरी केली (सरस्वती सेकंडरी स्कूल, ठाणे). त्यांनी मुकबधिरांसाठी अध्यापन कोर्स केला आहे. त्या ‘अमेय पालक संघटना’ या मंदबुद्धी मुलांसाठी संस्थेमध्ये कार्य करतात. त्यांनी मोठ्या कवींच्या कवितांधारे भाषाविषयक अनेक कार्यक्रम केले आहेत; विद्यार्थ्यांकडून नाटकेही सादर केली. त्यांनी 'संवाद साहित्यिकांशी' या प्रकल्पासाठी ठाणे, मुंबई येथून सत्तेचाळीस साहित्यिकांच्या मुलाखती सादर केल्या आहेत. त्यांनी 'ग्रंथाली वाचक चळवळी'द्वारे विविध उपक्रम राबवले. त्यांनी 'चंद्रभागा ते ओहायो' हे अमेरिकेचे प्रवासवर्णनात्मक आणि 'तो दृष्टी देऊन गेला' हे आत्मकथनात्मक अशी पुस्तके लिहिली आहेत.