Member for
7 years 3 monthsअंजली कुलकर्णी या पुण्याच्या कवयित्री. त्यांनी आतापर्यंत काव्यसंग्रह, ललित लेखसंग्रह, संपादीत अशी एकूण बारा पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी लिहिलेले 'पोलादाला चढले पाणी' हा रशियन कादंबरीचा अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. त्यांनी अनेक कवितांचे हिंदी आणि इंग्रजीतून अनुवाद केले आहेत. त्यांच्या लेखनाला आतापर्यंत महाराष्ट्र राज्य शासन, यशवंतराव प्रतिष्ठान यांसारख्या संस्थांकडून अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्या 'बाईंची कविता' (स्त्रीयांच्या कवितांवर आधारित), जन्मजान्हवी (स्वतःच्या कवितांवर आधारित), कवितेतील बापूजी (गांधीजींनी केलेल्या कवितांवर आधारित), कवितेची कार्यशाळा असे विविध कार्यक्रम सादर करतात. त्या 'शब्दमित्र' या पुण्यातील साहित्ियक संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. अंजली कुलकर्णी बँक ऑफ इंडियात कामाला होत्या. तेथून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी त्यांचा पूर्ण वेळ सामाजिक आणि साहित्यिक उपक्रमांना दिला आहे.
9922072158