Member for

6 months 3 weeks

पल्लवी परुळेकर-बनसोडे यांनी 'ग्रामीण साहित्याचा अभ्यास' या विषयात पीएच. डी. चे शिक्षण घेतले आहे. त्या ‘शब्दवेल साहित्य प्रतिष्ठान’ या वसई येथील संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांची ‘क्षण ओघळते’, ‘इवल्याशा जाणीवेने’ हे काव्यसंग्रह, पाऊलखुणा (ललित लेख संग्रह), ‘सांग ना गं आई’ (बालकविता संग्रह) आणि नि:शब्द (कथासंग्रह) ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पल्लवी ‘राजस्तरीय श्रीमंत नरवीर चिमाजी आप्पा साहित्य संमेलन’ आणि ज्येष्ठ गजलकार सुरेश भट यांच्या स्मृती प्रित्यर्थ ‘मराठी गजल मुशायरा’ अशा दोन कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी करतात. त्यांचे ‘जावे कवितांच्या गावा’, ‘साहित्य सौरभ’, ‘ग्रंथाक्षर’, ‘ऐसी अक्षरे रसिके’ आणि ‘एफ. एम. गोल्डवर मुलाखत’ असे आकाशवाणीवर कार्यक्रम झाले आहेत. त्यांनी विविध समारंभाची अध्यक्षस्थाने भूषवली आहेत. पल्लवी यांना ‘विरांगना सावित्रीबाई फुले राष्ट्रीय सन्मान पदक’, ‘राज्यस्तरीय ताराराणी गौरव पुरस्कार’ आणि ‘इंदिरा संत साहित्य गौरव पुरस्कार’ असे पुरस्कार मिळाले आहेत. त्या ‘फिलाटेलिक ब्युरो’ या भारतीय डाकमधील विभागाच्या सदस्य आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9923030101