Member for

2 years 11 months

प्रसाद देशपांडे हे नाशिकचे राहणारे. त्‍यांना नामवंत, प्रसिद्ध व्‍यक्‍तींची हस्‍ताक्षरे आणि स्‍वाक्ष-या जमा करण्‍याचा छंद आहे. ते खासगी कंपनीत व्‍यावसायिक पर्यावरण आणि सुरक्षा व्‍यवस्‍थापक पदावर कार्यरत आहेत. ते त्‍यांच्‍या कामाकडे केवळ 'जॉब' म्‍हणून नाही, तर कर्तव्‍य म्‍हणून पाहतात. त्‍या विचारातून त्‍यांनी 'गंगा माँ का दर्द' हा लघुपट तयार केला. त्‍यास महाराष्‍ट्र राज्‍य शासनाकडून 'उत्‍कृष्‍ट लघुपट' पुरस्‍कार प्राप्‍त झाला. तो लघुपट इतर काही चित्रपट महोत्‍सवांमध्‍ये पुरस्‍कारांनी गौरवण्‍यात आला. प्रसाद देशपांडे यांचा पर्यावरण आणि सुरक्षा या विषयीच्या सामाजिक कार्यात सहभाग असतो. त्‍यांना ते करत असलेल्‍या व्यावसायिक सुरक्षेच्‍या कामासाठी आणि रस्ता सुरक्षेसाठी राज्‍य शासनाकडून दोनवेळा गौरवण्‍यात आले आहे. प्रसाद यांना त्यांच्‍या छंदामुळे महाराष्‍ट्रातील विविध छंदवेड्या व्‍यक्‍तींना एकत्र करण्‍याचे वेध लागले आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9762262691