Member for

3 years 11 months

मुकुंद कुळे हे व्‍यवसायाने पत्रकार. ते पंचवीस वर्षांपासून त्‍या क्षेत्रात कार्यरत आहे. ते दैनिक 'महाराष्‍ट्र टाईमस'मध्‍ये नोकरी करतात. त्‍यांना साहित्य- कला- संस्कृती यांमध्‍ये विशेष रस आहे. कुळे यांनी लिहिलेले 'पंचलावण्य' हे पहिले पुस्तक. त्‍यात महिला लावणी कलावंतांच्‍या चरित्रलेखांचे संकलन आहे. त्‍यांच्‍या 'इतिहासाचे साक्षीदार' या दुस-या पुस्तकास राज्यशासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे. त्‍यांनी 'लोकरहाटी' या पुस्तकातून नामशेष होत चाललेल्या ग्रामसंस्कृतीचा वेध घेतला आहे. ते पुस्तकही राज्यशासन पुरस्काराने गौरवण्‍यात आले. कुळे यांची इतर तीन संपादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्‍या तीनही पुस्तकांत प्रसिद्ध लेखक-नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या लेखांचे संकलन आहे. त्यांची नावे अनुक्रमे 'कायमचे प्रश्न', 'रंग-रुप' आणि 'रस-गंध' अशी आहेत. कुळे यांचा लोकसाहित्य हा आवडीचा विषय. त्‍यांचे गेली काही वर्षे तत्संबंधीचे संशोधन सुरू आहे. त्‍यांनी त्या विषयावर आधारित लेख विविध परिसंवादांत वाचले आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9769982424