Member for

4 years 6 months

डॉ. रामकुमार प्रधान हे मूळचे गोंदिया जिल्‍ह्याचे. ते वास्‍तव्यास ठाणे येथे असतात. त्‍यांनी नागपूर विद्यापीठातून पदवीत्तर शिक्षण पूर्ण केले. ते २००१ मध्ये नेट परीक्षा उत्तीर्ण झाले. ते 'श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठा'च्या इतिहास विभागात सहाय्यक प्राध्यापक या पदावर २००३ पासून कार्यरत आहेत. त्‍यांचे नागपूर विद्यापीठातून 'आदिवासी समाजाचा इतिहास' या विषयात पी. एचडी.चे संशोधन पूर्ण झाले आहे. त्‍यांनी लिहिलेली 'आदिवासी विकास' व 'संस्कृतीचा इतिहास' ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्‍यांनी 'आदिवासी समाज', 'आदिवासी जमातीची संस्कृती', 'आदिवासी समाजाची सामाजिक आर्थिक-वर्तमान स्थिती' या विषयांवर लिहिलेले शोधनिबंध राष्‍ट्रीय-आंतरराष्ट्रीय संशोधन जर्नल व मासिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. प्रधान हे आदिवासी जमातीमधील विविध संस्थाचे पदाधिकारी असून ते महाराष्ट्रातील 'जागतिक आदिवासी दिन' आयोजन समितीचे सदस्य आहेत. आदिवासी जमातीमधील युवकांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्‍यात त्‍यांचा सहभाग असतो.

लेखकाचा दूरध्वनी

7208424302