Member for

3 years 10 months

सतीशचंद्र तोडणकर हे इंग्रजीचे प्राध्‍यापक. बी.ए.ला मानसशास्‍त्र आणि इंग्रजी हे विषय घेऊन ते फर्ग्‍युसन महाविद्यालयातून प्रथम श्रेणीत उत्‍तीर्ण झाले. त्‍यांनी दापोली येथील 'अल्‍फ्रेड गॅडने ज्‍युनिअर कॉलेज ऑफ सायन्‍स'मध्‍ये पंचवीस वर्षे इंग्रजी विषयाचे अध्‍यापन केले. त्‍यांना रत्‍नागिरी जिल्‍हा परिषदचा 'आदर्श शिक्षक' पुरस्‍कार 1995 साली मिळाला. त्‍यांनी दहा वर्षे दापोलीच्‍या 'नवभारत छात्रालया'चे मानद सहव्यवस्‍थापक म्‍हणून काम पाहिले. तोडणकर यांनी पंचवीस वर्षे 'दैनिक सागर'मध्‍ये हौशी पत्रकारिता केली. त्‍यांनी लिहिलेले 'संक्षिप्‍त गीतारहस्‍य' हे पुस्‍तक प्रकाशित झाले आहे.

लेखकाचा दूरध्वनी

8380064640