Member for

4 years 8 months

डॉ. कृष्णा इंगोले हे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, कुशल प्रशासक व प्रसिद्ध साहित्यिक आहेत. ते सांगोला महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची धुरा सांभाळत आहेत. ते प्राचार्यपदी असले तरी ते वर्गात व्याख्यान देण्याचे काम अजूनही करतात. ते ज्या ग्रामीण परिसरात वाढले, घडले, संस्कारित झाले, त्या परिसराशी ते कृतज्ञ राहिले आहेत. त्‍यांनी त्या ग्रामीण विद्यार्थ्यांना तळमळीने ज्ञानदान केलेले आहे. शिक्षण हा त्यांचा पेशा नसून ते त्यांचे जिवितकार्य आहे असे म्हणणे यथोचित होईल. त्यांनी सांगोला तालुक्याच्या साहित्यिक व सांस्कृतिक जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. त्‍यांच्‍यासंदर्भात 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'वर प्रसिद्ध केलेला सविस्‍तर लेख!

लेखकाचा दूरध्वनी

9423236144