कार्तिकस्नान आणि कार्तिक पौर्णिमा
29/07/2011
कार्तिक मासात महिनाभर नित्य पहाटे स्नान करतात, त्याला कार्तिकस्नान असे म्हणतात. हे एक व्रत असते. अश्विन शुध्द दशमी, एकादशी किंवा पौर्णिमा या दिवशी स्नानाचा प्रारंभ करून कार्तिकी पौर्णिमेस त्याची समाप्ती करतात. स्नान पहाटे दोन घटका रात्र उरली असता, नदीत किंवा तलावात करतात. प्रथम संकल्प करून उर्ध्व देतात आणि नंतर पुढील मंत्र म्हणून स्नान करतात.
कार्तिकेS हं करिष्यामि प्रात:स्नानं जनार्दन |
प्रीत्ययं तव देवेश जतेSस्मिनं स्नातुमृहात: |
(अर्थ- हे जनार्दना, देवेशा, मी तुझ्या प्रीतीसाठी या जलामध्ये कार्तिक मासात प्रात:स्नान करीन.)