‘श्यामची आई’ म्हणजे मधाचं पोळं


(‘श्यामची आई’ या पुस्तकास पंचाहत्तर वर्षे झाली, त्या निमित्ताने)

साने गुरुजींच्या जीवनात आचार आणि विचार यांचं सौंदर्य त्यांच्या आईनं निर्माण केलं. हळुवार भावना, निसर्गावरील प्रेम, नक्षत्रांचं आकर्षण, माणसाविषयी कणव हे सर्व सदगुण म्हणजे आईची देणगी. ती कृतज्ञ भावनेनं व्यक्त करणं हाच मनाचा मोठेपणा आहे. साने गुरूजी हे अशा आदर्शाचं मूर्तिमंत उदाहरण होतं.

त्यामुळे ‘श्यामची आई’ हे पुस्तक पाऊण शतक टिकलं. त्याच्या लक्षावधी प्रती संपल्या. ज्यांना वाचनाची आवड लागते त्या मुलांनी प्रारंभी ‘श्यामची आई’ हे पुस्तक वाचलं असावं, असं खुशाल समजावं.

हे पुस्तक वाचताना डोळ्यांतून अश्रू वाहिले नाहीत असा वाचक विरळा, अनेक प्रसंगांतून श्यामला धडा मिळतो. मात्र त्या प्रसंगात कृत्रिमता नसते. उपदेशामृत पाजण्याचा आव नसतो. गुरूजींची ही शैली वाचकाला मंत्रमुग्ध करते.

चंदाताई तिवाडी यांचा ‘बुर्गुंडा’


-राजेंद्र शिंदे

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या तिस-या मजल्यावरील मिनी थिएटरमध्ये कलावंत आपली कला सादर करत होता. कलाकाराला नृत्य, संगीत आणि रसाळ निरुपणाची खणखणीत जाण होती. कलाकाराची पद्यामधील लयतालावर उंच उडी मारण्याची लकब प्रेक्षकांची दाद घेऊन जात होती. कलाकार लोककलेतील भारूड हा प्रकार सादर करत होता. भारूड सादर करणारा कलाकार सहसा पारंपरिक वेषातला पुरूष म्हणून अवतरतो. परंतु ही चक्क एक स्त्री होती. भारूडी चंदाताई तिवाडी!

चंदाबाई रंगमंचावर भारुडातल्या कलाप्रकाराला साजेशा ढोलकी व टाळांच्या नादावर उंच उड्या मारत होत्या.

अचानक, त्यांना नऊ महिन्यांपूर्वीचा प्रसंग आठवला आणि त्यांनी तो श्रोत्यांना कथन केला. त्या नऊ महिन्यांपूर्वी टिटवाळा येथे भारुडाचा कार्यक्रम करत असताना, त्यांना त्यांच्या सुनेला दिवस गेले असल्याची आनंदाची बातमी समजली. सुनेला सोळा वर्षे मूल होत नव्हते. त्यामुळे नातवाचे तोंड पाहण्यास चंदाताई व घरची मंडळी आसुसली होती. त्यांनी उत्स्फूर्तपणे व श्रद्धापूर्वक टिटवाळ्यांचा ‘गणपती बाप्पा पावला!’ असे उद्गार काढले.

चंदाताईंचा आवाज भारावलेला होता. त्या कार्यक्रमात भारूड सादर करत होत्या आणि त्यांना आठवण होत होती येऊ घातलेल्या आपल्या नातवाची!

सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र

प्रतिनिधी 17/05/2011

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, पाच वेगवेगळे विभाग एकत्र आले, परंतु लोकांनी परस्परांना समजून घेण्याची प्रक्रियाच राज्यात घडून आली नाही. भावनिक एकात्मता व समतोल विकास यांबाबतीत फार बेजबाबदार वर्तन आपल्याकडून –शासन, राजकारणी व लोकही यांच्याकडून झाले आहे.

पी.बी.पाटील

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, पाच वेगवेगळे विभाग एकत्र आले, परंतु लोकांनी परस्परांना समजून घेण्याची प्रक्रियाच राज्यात घडून आली नाही. भावनिक एकात्मता व समतोल विकास यांबाबतीत फार बेजबाबदार वर्तन आपल्याकडून –शासन, राजकारणी व लोकही यांच्याकडून झाले आहे. केवळ सीमाप्रश्नावर दंड थोपटून चालणार नाही. विदर्भ-मराठवाडा-खानदेश-कोकण-पश्चिम महाराष्ट्र या सार्‍यांनी एकमेकांची मने जाणली पाहिजेत. नुसता भूगोल एकत्र करून काय उपयोग?

संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव:

पुनरावलोकन परिषदा

संयुक्त महाराष्ट्र सभा


प्रस्ताव : मराठी भाषा बोलणा-या सर्व सलग प्रदेशाकरता म्हणजे ‘संयुक्त महाराष्ट्रा’करता अधिकारवाणीने बोलू शकेल अशी एकही संस्था सध्या अस्तित्वात नाही. निरनिराळ्या राजवटींमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा प्रदेश विभागला गेल्यामुळे उपरीनिर्दिष्ट संस्थेसारख्या मध्यवर्ती संस्थेची स्थापना अद्याप होऊ शकली नाही असे दिसते. तथापी यापुढील काळ निराळा असल्यामुळे व विशेषत: भावी हिंदी फेडरेशनचा भाषावार प्रांतरचना हाच पाया मुख्यत: राहणार असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राकरता अधिकारवाणीने बोलू शकणार्‍या, स्थिर पायावरील मध्यवर्ती संस्थेची जरुरी आहे.

संयुक्त महाराष्ट्र सभा

प्रतिनिधी 15/05/2011

संयुक्त महाराष्ट्राने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक
क्षेत्रांत मागे पडू नये यासाठी 'संयुक्त महाराष्ट्र सभे'ची
संस्थापना करण्याच्या हाती घेतलेल्या उपक्रमाबाबत...

महाराष्ट्रीयांना जाहीर विनंती

प्रस्ताव : मराठी भाषा बोलणा-या सर्व सलग प्रदेशाकरता म्हणजे ‘संयुक्त महाराष्ट्रा’करता अधिकारवाणीने बोलू शकेल अशी एकही संस्था सध्या अस्तित्वात नाही. निरनिराळ्या राजवटींमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा प्रदेश विभागला गेल्यामुळे उपरीनिर्दिष्ट संस्थेसारख्या मध्यवर्ती संस्थेची स्थापना अद्याप होऊ शकली नाही असे दिसते. तथापी यापुढील काळ निराळा असल्यामुळे व विशेषत: भावी हिंदी फेडरेशनचा भाषावार प्रांतरचना हाच पाया मुख्यत: राहणार असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राकरता अधिकारवाणीने बोलू शकणा-या, स्थिर पायावरील मध्यवर्ती संस्थेची जरुरी आहे. विशेषत: , ‘आंध्र महासभा,’ ‘कर्नाटक एकीकरण लीग’ अशांसारख्या आपापल्या मध्यवर्ती संस्था उभारून निरनिराळ्या राजवटींत विखुरलेले ‘आंध्र’ व ‘कर्नाटक’ यांच्यासारखे शेजारचे प्रांत आपापली प्रांतसंघटनेची पूर्वतयारी उत्साहाने व यशस्वी रीतीने करत असताना ‘संयुक्त महाराष्ट्रा’ने मागे पडणे इष्ट नव्हे आणि याच हेतूने आम्ही ‘संयुक्त महाराष्ट्र सभे’ची स्थिर पायावर संस्थापना करण्याचा उपक्रम हाती घेतला असून या कामी शक्य ते साहाय्य देण्याबद्दल सर्व महाराष्ट्रीयांना सविनय विनंती करत आहोत :

आमिरखान, व्ही. शांताराम, साने गुरुजी अन् घाट कुरुंदवाडचा !


हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेता आमिरखान यांनी कुरुंदवाडच्या घाटावरील स्मशानभूमीत विश्रांती घेतली होती, असे जर कुणी सांगितले तर ते पटेल का? पण अपार थकल्यामुळे, त्यांनी तेथे तास-दीड तास विश्रांती घेतली होती अशी आठवण कुरुंदवाडच्या नागरिकांनी जपली आहे, आमिरखान यांचा ‘द रायझिंग सन - मंगल पांडे’ हा चित्रपट २००५ साली पडद्यावर आला, केतन मेहतांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. आमिरखानबरोबर राणी मुखर्जी, अमिषा पटेल आणि ओमपुरी यांच्या त्यात प्रमुख भूमिका आहेत. त्यावेळची ही गोष्ट आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण देशाच्या विविध भागांत झाले. मात्र मंगल पांडे यांच्या जीवनातील उत्तर प्रदेशातील मेरठ भागात घडलेल्या काही प्रसंगांसाठी नदीकाठचा घाट हवा होता. आमिरखान आणि त्यांची टीम असे घाट पाहत हिंडत होते. टीममध्ये कोल्हापूरचा तरुण होता. त्याने बालपणी कुरुंदवाडचा कृष्णा घाट पाहिला होता. त्याने या घाटाची माहिती आमिरखान यांना दिली. टीम नाशिकचा गोदाघाट पाहून निघाली ती तडक कुरुंदवाडला पोचली. आमिरखान कुरुंदवाडच्या कृष्णा घाटावर आले. त्यांनी घाट चारी बाजूंना फिरून पाहिला. त्यांना व त्यांच्या टीमला घाट पसंत पडला. त्यांनी ‘मंगल पांडे’चे महत्त्वपूर्ण चित्रिकरण तिथे करण्याचा निर्णय घेतला.

कमळ - मानाचं पान!

प्रतिनिधी 13/05/2011

कमळ - मानाचं पानभारतीय संस्कृतीतील लाडकं फूल म्हणजे कमळ. साहित्य, शिल्प, धर्म... सगळीकडे कमळाला मानाचं पान आहे. 'कमल नमन कर' अशा जोडक्षरविरहित, अगदी साध्या वाक्यातून लिहिण्या-वाचण्याचा श्रीगणेशा केला जातो. कमळ, कुमुद, कुमदिनी, कृष्णकमळ आणि अगदी गेल्या काही वर्षांत प्रसिध्दीच्या झोतात आलेलं ब्रह्मकमळ या सर्वांचा मागोवा घेण्यासाठी हे कमळपुराण.

कमळ या नावाखाली ज्या प्रजाती येतात त्यांत नेलम्बो, निम्फया, व्हिक्टोरिया यांचा समावेश आहे. जाणकारांच्या मते, यांतील सर्वाधिक गौरवली जाणारी प्रजाती म्हणजे नेलम्बो . संपूर्ण नाव- नेलम्बो न्युसिफेस. पत्ता अर्थात सरोवरे, तळी, तडाग आणि संथ नद्याही. या कमळाशी भारतीय तज्ञांचा अतिशय परिचय पूर्वापार आहेच, पण सामान्यांनी ओळखण्याची खूण म्हणजे त्यांची पाने आणि फुले पाण्याला स्पर्श करत नाहीत, तर पाण्याच्या पृष्ठभागापासून वीतभर किंवा अधिक उंच अंतरावर वाढतात.

महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सवी जागर

प्रतिनिधी 09/05/2011

महाराष्ट्र राज्य स्थापनेस १ मे २०१० ला पन्नास वर्षे पूर्ण झाली. अर्धशतकपूर्तीनिमित्त आत्मपरीक्षणासाठी व पुढील वाटचालीसाठी गेल्या पन्नास वर्षांतील स्थितिगतीचा आढावा जसा आवश्यक आहे ; तसा तो शतकाच्या मध्यंतरानंतर एकत्र आलेल्या मराठी भाषकांच्या सांस्कृतिक उन्नयनाचा विचार करणार्‍या संस्था, शासन व लोक यांच्या परिशीलनासाठीही जरूरीचा आहे. सांस्कृतिक एकात्मतेचा विचार मनीमानसी मुरल्याशिवाय एकत्र काम करण्याची ऊर्मी जागी होत नाही. संयुक्त महाराष्ट्रात मुंबई, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ यांचा प्रथमच एकत्र एका राज्यात समावेश झाला. त्यांच्या प्रगतीचा विविध मार्गांनी विचार करत असताना मनोमिलनाचा तपशील लक्षात घेतला पाहिजे. सांस्कृतिक एकात्मतेच्या जागरासाठी ते जरुरीचे आहे.

१.

तरंग आणि बारापाचाची देवस्की


तरंग. यांना खांबकाट्या असेही म्हणतात आचरा नदीने रत्नागिरी जिल्ह्याचे दोन भाग केले आहेत. पैकी दक्षिणेकडचा भाग म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. ही संस्कृती गोव्याला जवळची, ती रत्नागिरी-रायगड जिल्ह्यांहून वेगळी आहे. त्या भागात एक वेगळी ‘तरंग’ संस्‍कृती नांदत होती. त्या भागातील रवळनाथ, माऊली, सातेर, वेतोबा ही देवस्थाने इतरत्र सापडत नाहीत.
 

तरंग म्हणजे देवस्थानास आवश्यक असलेले विशेष प्रकारचे उपकरण. वेळूच्या जाडीइतक्या लाकडी दांड्याच्या एका टोकाला लुगडे गुंडाळून भलामोठा बोंगा करतात. रवळनाथ, भूतनाथ, वेताळ, भैरव इत्यादी देवांच्या आणि सातेरी, माऊली यांसारख्या भूमिदेवतांच्या देवळांत ही ‘तरंगे’ असतात. ती दसरा, शिमगा, जत्रा अशा वेळी बाहेर काढून, गुरव किंवा भगत खांद्यावर घेतात. ‘तरंग’ खांद्यावर घेणार्‍याच्या अंगात त्या त्या देवतेचे वारे येते. मग अंगातील देवाकडून भक्तगण कौल, प्रसाद घेतात. ही तरंगे जत्रेत व गावच्या पंचक्रोशीत फिरून परत मंदिरांत येतात. तरंगांचा संचार ही प्रथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खास वैशिष्ट्य आहे.
 

अंधांची पदयात्रा


मुंबई (अँटाप हिल) ते शिर्डी

निघाली साईंची पालखी

     अंधांची पदयात्राआम्ही शिर्डीला जाण्यासाठी 'ॐ साई'च्या जयघोषात पालखीबरोबर चालू लागलो आणि क्षणार्धात पुढील आठ दिवसांचा प्रवास नजरेसमोर तरळला, अंत:करण भरून आले. डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. मी माझ्या अंध मैत्रिणीला - पारूला सोबत करण्यासाठी म्हणून ह्या पालखीबरोबर निघाले होते. पारूसारखे सतरा पदयात्री, सारे अंध, पायी प्रवास करून साईचं ‘दर्शन’ घेऊ इच्छित होते!

     पालखी शिर्डीला पोचेपर्यंत, मी त्यांच्या श्रद्धेने भारावून गेले आणि माझी परमेश्वर/परमार्थ ह्याबाबतची अलिप्तता गळून पडली!