दुर्लक्षित अवचितगड


अवचितगड भग्नावस्थेत आहे. निरनिराळ्या वास्तू ढासळत आहेत. विशेषत: द्वादशकोनी तलावाच्या पाय-यांच्या बाजूची भिंत कोसळण्याच्या अवस्थेत आहे. त्यात उगवलेल्या झाडांमुळे बांधकाम खचत आहे. झाडे काढली तरी धोका-न काढली तरी धोका! शंकराचे मंदिर उन, वारा, पाऊस खात आहे. देवाधिदेव महादेव उघड्यावर पडलेला आहे. वेळीच बंदोबस्त न केल्यास संपूर्ण उत्तर बुरुज ढासळण्यास वेळ लागणार नाही.

अवचितगड हा कोकण आणि देशपठार यांच्यामधोमध असल्यामुळे संदेशवहन व हेरगिरी यांच्यासाठी उपयुक्त किल्ला मानला जाई. नागोठणे बंदर, रोहे बंदर, तळा, घोसाळा या परिसरातील धारा-वसुलीचे काम अवचितगडावरून होत असे.

मौर्य, सातवाहन, शक, क्षत्रप, अभीर, त्रैकुटक, वाकाटक, अश्मक, चालुक्य, राष्ट्रकूट, कलचुरी कदंब, शिलाहार, यादव, मोगल, मराठे, पेशवे या निरनिराळ्या राजवटींमध्ये किल्ल्यांची वहिवाट होती. इसवी सनपूर्व पाचशेेच्या आसपास सुरू झालेली किल्लेसंस्कृती पुढे उत्तरोत्तर प्रगत होत गेली ती सतराव्या शतकापर्यंत. जवळपास दोन-अडीच हजार वर्षांचा हा इतिहास आहे.

रायगड-राजगड यांच्या तीनशे फे-यांतील संशोधन!

प्रतिनिधी 07/11/2011

मिलिंद पराडकर यांच्या पुस्तकाचे जुलैमधील गिरिमित्र संमेलनात (2011) प्रकाशन झाले, तो क्षण त्यांच्यासाठी स्वप्नपूर्तीचा होता! ते स्वप्न त्यांच्या आईने पाहिले होते. मिलिंदने गडदुर्गांचा जो अभ्यास केला तो पुस्तकरू  पाने यावा असे तिला वाटे. तो क्षण आला पण तोवर ती मात्र राहिली नव्हती! आईला तसे वाटणे हे स्वाभाविक होते, कारण मिलिंदच्या वेडाचे, छंदाचे रूपांतर तिच्याच समोर अभ्यासात होत गेलेले तिने पाहिले होते. मिलिंदला त्याच्या या अभ्यासामधून पीएच.डी. पदवी प्राप्त झाली. मात्र त्यासाठी त्याने काही वर्षे अपार मेहनत घेतली.

मिलिंद सांगत होते, ‘या अभ्यासादरम्यान काही अभूतपूर्व माहिती माझ्या हाती आली. रायगडावरील इमारती लांबीरुंदीचे जे प्रमाण योजून रचल्या गेल्या ते सूत्र मला गवसले. ते मी साधार अन सचित्र असे प्रबंधात मांडले आहे’.

‘प्राचीन भारतीय दुर्गशास्त्र आणि हिंदवी स्वराज्याच्या दोन राजधान्या- राजगड व रायगड : एक तुलनात्मक अभ्यास’ हा त्यांचा प्रबंधविषय. मिलिंद यांचा प्रबंध फेब्रुवारी 2008 ते मार्च 2010 ह्या काळात लिहून पूर्ण झाला. त्याचे पुस्तकरूपातील प्रकाशन संमेलनात  झाले. सर्वच गिर्यारोहकांच्या दृष्टीने तो अभिमानाचा क्षण होता. गेल्या दोन-तीन दशकामध्ये गिरिभ्रमणाचे वेड खूप वाढत गेले आहे. परंतु ते छंदाच्या, हौशीच्या, किंवा फारतर सामाजिक कार्याच्या दृष्टीने महत्त्वाचे वाटत आले आहे. या विषयाचा अभ्यास फार थोड्या लोकांनी केला.

 

तुळशीचे लग्न


तुळशीचे लग्न दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीस लावले जाते. त्या संबंधातील कथा पद्मपुराणा आहे. ती अशी, की जालंधर नावाचा महाप्रतापी व असाधारण योध्दा राक्षस होऊन गेला. त्याने आपल्या पराक्रमाने देवांना जिंकून वैभव प्राप्त केले आणि आपल्या भाईबंद दैत्यांस सुखी केले. त्याची वृंदा नावाची पत्नी महापतिव्रता होती. तिच्या पुण्याईमुळे जालंधर त्रिभुवनात अजिंक्य ठरला होता. त्याने इंद्रपुरीवर चाल करून इंद्राची खोड मोडण्यासाठी कडेकोट तयारी चालवली होती. पुढे, देव व दैत्य यांच्यांत युध्द होऊन अनेक देवांस गतायू व्हावे लागले. तेव्हा विष्णूने जालंधरास युद्धात हरवण्यासाठी कपटकारस्थान रचले. त्याने जालंधराची पत्नी वृंदा हिच्या जाज्वल्य पातिव्रत्यामुळेच जालंधरास सामर्थ्य प्राप्त झाले आहे हे जाणून, ते नष्ट करण्यासाठी युक्ती योजली.

पुसेगावचा रथोत्सव


सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथे दरवर्षी मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला, सेवागिरी महाराजांचा रथोत्सव साजरा केला जातो. सेवागिरी महाराजांनी त्यांचे कार्य संपल्यानंतर (10 जानेवारी 1948 या दिवशी, मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला) पुसेगाव येथे समाधी घेतली. त्यानंतर पुसेगावात रथोत्सव साजरा केला जाऊ लागला.

पुसेगावचे मूळ नाव पुसेवाडी असे होते. सातारा-पंढरपूर मार्गावर वेदावती नदीच्या तीरावर वसलेले, जेमतेम पन्नास-शंभर उंबर्‍यांचे खेडेगाव. पुसेवाडी हा रामायणकालीन दण्‍डकारण्याचा भाग समजला जातो. अंदाजे पाचशे वर्षांपूर्वी एका धनगर कुटुंबामुळे पुसेवाडी ही वसाहत झाली. पुसेवाडीची दुसरी नोंद नेर-पुसेवाडी अशी आहे. धनगर कुटुंबाच्या जोडीला असणारी शहाण्णव कुळी मराठा जाधव मंडळी ही बारामती तालुक्यातील परिंचे या गावाहून येथे आली असे समजतात.

मुख्याध्यापकांची थेट भरती केली तर?

प्रतिनिधी 01/11/2011

- श्रीधर गांगल

शिक्षकीपेशा हा त्यांच्या रोजीरोटीचा मार्ग, पण ठाण्यातील काही शिक्षक नि शिक्षणप्रेमी महिन्यातून एक दिवस एकत्र जमतात. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विचार करण्यासाठी. त्या उपक्रमाचे नाव आहे ‘व्यासपीठ’. शिक्षकांचे प्रबोधन व्हावे, त्यांना प्रेरणा मिळावी नि त्यासाठी प्रयत्न व्हावे या उद्देशाने शिक्षकांनी शिक्षकांसाठी चालवलेला तो उपक्रम आहे. त्यास पालक येऊ शकतात. त्यांनी तीन वर्षांत अनेक छोटेमोठे कार्यक्रम केले. ह्यावेळी ‘शिक्षकांचे प्रशिक्षण’ ह्या महत्त्वाच्या पण महत्त्व हरवलेल्या विषयावर चर्चा झाली.

ठाण्यामधली ‘व्यासपीठ’ नावाची  एक चळवळ. शिक्षक म्हणून नोकरी लागण्यासाठी शिक्षणशास्त्रातील पदवी किंवा पदविका ही आवश्यक आहेच, पंरतु ‘शिक्षक घडणे’ ही अव्याहत चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षण कसे असावे? तर जीवन समृध्द करणारे असावे. आपल्या व दुसर्‍याच्या श्रध्दा जपून समाजासाठी काही करण्याची प्रेरणा शिक्षणातून मिळायला हवी. तर मग दोषारोप करत बसण्यापेक्षा काही करून दाखवावे या विचाराने ठाणे व परिसरातील काही शिक्षक, प्राध्यापक, शिक्षणप्रेमी नागरिक असे सर्व एकत्र आले आणि ‘व्यासपीठ’ तयार झाले.

 

कार्तिक पौर्णिमा!


     कार्तिक मासात महिनाभर नित्य, पहाटे स्नान करतात, त्याला कार्तिकस्नान असे म्हणतात. हे एक व्रत असते अश्विन शुध्द दशमी, एकादशी किंवा पौर्णिमा या दिवशी स्नानाचा प्रारंभ करून कार्तिकी पौर्णिमेस त्याची समाप्ती करतात. स्नान पहाटे दोन घटका रात्र उरली असता, नदीत किंवा तलावात करतात. प्रथम संकल्प करून उर्ध्व देतात आणि नंतर पुढील मंत्र म्हणून स्नान करतात.

कार्तिकेS हं करिष्यामि प्रात:स्नानं जनार्दन |
प्रीत्ययं तव देवेश जतेSस्मिनं स्नातुमृहात: |

     अर्थ- हे जनार्दना, देवेशा, मी तुझ्या प्रीतीसाठी या जलामध्ये कार्तिक मासात प्रात:स्नान करीन.
     हे व्रत पुत्रप्राप्तीसाठी घेतलेले असेल तर स्नानानंतर अभिकाष्ठक नावाचे स्तोत्र पठण करतात. स्नानानंतर पुनश्च उर्ध्व देऊन स्नानविधी पूर्ण करतात. संपूर्ण महिनाभर प्रात:स्नान करणे शक्य नसल्यास कार्तिक शुक्ल एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत निदान पाच दिवस तरी ते करावे असे सांगितले आहे. या व्रतामुळे वर्षभरातील सर्व पापांचे क्षालन होते!

     कार्तिक पौर्णिमा या दिवशी कार्तिक स्नानाची समाप्ती होते. ही तिथी उत्तर भारतात पवित्र व पुण्यप्रद मानली जाते. या दिवशी सोनपूर, गढमुक्तेश्वर (मेरठ), वरेश्वर (आगरा), पुष्कर (अजमेर) इत्यादी ठिकाणी जत्रा भरते. या शुभदिनी स्नान व दान करणे आवश्यक मानले जाते. पुष्कर, कुरुक्षेत्र आणि वाराणसी ही तीर्थक्षेत्रे स्नान व दान यासाठी महत्त्वपूर्ण मानली जातात.

तुंबडीवाल्यांचे गाव


‘तुंबडीवाला’ हा गोंधळी , भराडी , वासुदेव , पांगुळ, बहुरूपी या लोकगायकांच्या परंपरेतला लोकसंस्कृतीच्या उपासकांतील महत्त्वपूर्ण घटक होय. तुंबडीवाल्यांचे वास्तव्य महाराष्ट्राच्या वर्धा  जिल्ह्यात आढळून येते. कारंजा (घाडगे) तालुक्यातील खापरी हे गाव तुंबडीवाल्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांचा परंपरागत, पिढीजात व्यवसाय म्हणजे ‘तुंबडी’ या वाद्यावर गाणी म्हणून भिक्षा मागणे. त्यांच्यापैकी काही मंडळी शेतीव्यवसाय व पशुपालन करत आहेत, नवी पिढी शिक्षण घेत आहे. मात्र हे प्रमाण नाममात्र आहे.

आले सरकारच्या मना...!

प्रतिनिधी 17/10/2011

- किरण क्षीरसागर

राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था या दोन्ही सरकाराधीन संस्थांच्या कामांचे स्वरूप एकच असल्‍याचा शोध लावत सरकारकडून या दोन्‍ही संस्‍थांच्‍या एकत्रिकरणाचा निर्णय घेण्‍यात आला आहे. मुळात या दोन्‍ही संस्‍थांची उद्दिष्‍टे वेगवेगळी, कार्य वेगवेगळे, मग त्यांचे एकत्रिकरण कसे काय होऊ शकते? काही मान्‍यवरांशी चर्चा करून या निर्णयाच्‍या योग्यायोग्‍यतेबद्दल ‘थिंक महाराष्‍ट्र’कडून घेण्‍यात आलेला हा आढावा.
 

- किरण क्षीरसागर

खानदेशची कानुबाई


कानुबाईचे आगमन  ‘कानुबाई’ हे खानदेशचे आराध्यदैवत. कानुबाईच्याच नावाने खानदेशाला ‘कानुबाईचा देश’-कानदेश- ‘खानदेश’ असे नाव मिळाले आहे. ‘खानदेश’ नावाची उत्पत्ती तशी सांगितली जाते. कानुबाईचा उल्‍लेख ‘कानबाई’ असाही केला जातो.

कानुबाई ही निसर्गदेवता आहे. तिला प्रकृती मानले जाते. वंशवृद्धी व गोधनवृद्धीसाठी या निसर्गदेवतेची पूजा करण्यात येते. नागपंचमी च्या पहिल्या रविवारी कानुबाईची स्थापना करण्यात येते. कानुबाई ही श्रीफळ म्हणून पवित्र मानल्या जाणार्‍या नारळाच्या रूपाने घरोघरी आणली जाते. बर्‍याच ठिकाणी हे नारळ पिढ्यानपिढ्या तेथील देव्हार्‍यात जतन करून ठेवलेले असतात. कानुबाईची स्थापना ठरावीक घरांतच होत असली तरी शेजारीपाजारी, भाऊबंदकीतले लोक त्या कुटुंबांच्या आनंदात सहभागी होतात. यातून समाजात एकोपा व प्रेम वृद्धिंगत होते व समाज गुण्यागोविंदाने नांदतो.

कोजागरी पौर्णिमा


‘को जागर्ति?’ असे देवीने विचारले. शिवाजी महाराजां नी तिला ‘मी जागा आहे आणि मी स्वराज्य व सुराज्य निर्माण करीन’ असे वचन दिले. ते त्या वचनाला जागले अशी कथा प्रचलीत आहे. ‘को जागर्ति?’ ही मुळात एक कविकल्पना; त्यामुळे ती वेगवेगळ्या महापुरुषांच्या संदर्भात योजून पुराणकथा रचल्या जातात त्यांतलीच ही एक. आख्यायिकांनुसार, उत्तररात्री साक्षात लक्ष्मी येऊन (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे विचारते, म्हणून या दिवसाला 'कोजागरी पौर्णिमा' असे म्हणतात.