अहिराणी : प्रमाणित आणि बोली यांमधील उलटा क्रम


 अहिराणी बोलीच्या संमेलनातले डॉ. सुधीर देवरे यांचे अध्यक्षीय भाषणामधे मांडलेले मुद्दे मला पटले नाहीत.

१. देवरे यांचे प्रास्ताविक न वाचतादेखील मी त्यांचे अहिराणीमधील भाषण पूर्णपणे व्यवस्थित समजू शकलो. समजण्याकरता मला त्यांच्या प्रास्ताविकाची गरज भासली नाही.  

२. भाषणावर चालू घडीच्या मराठीची छाप आहे. त्यातले काही प्राचीन दिसत नाही.  

३. विशेषत्वाने खटकलेली गोष्ट अशी की Historical Linguistics या शास्त्रामधे एखाद्या भाषेला प्राचीन का म्हणावे आणि त्यातही आदिम का म्हणावे याचे जे निकष मानले जातात, ते देवरे यांच्या भाषणाला लागू पडत नाहीत.  

४. बहुतेक सर्व शब्द चालू घडीच्या मराठी भाषेतल्या शब्दांचे variant म्हणावे असे आहेत. एवंच, सर्व शब्द प्रचलित मराठी शब्दांचे अपभ्रंश दिसतात.  

५. ज्या भाषा किंवा बोली आदिम मानल्या जातात त्यांचा प्रमुख गुणधर्म असा असतो, की 

आकाशगंगा


पौराणिक कल्पनेनुसार आकाशगंगा म्हणजे एकचक्र रथात बसून ज्या मार्गाने जातो तो मार्ग होय. दुस-या ग्रंथात म्हटले आहे, की वामनावतारात विष्णू तिथे पाऊल टाकत असताना ते एका अंड्याला लागून अंडे फुटले. त्यातून निघालेला प्रवाह म्हणजे आकाशगंगा. बहुतेकांना स्वर्गारोहण करण्याची शिडी म्हणजे आकाशगंगा होय असे वाटते. स्वर्गातील अमरावतीला आकाशगंगेने वेढले असल्याचा उल्लेख भागवतात आहे.

आकाशगंगेचा पट्टा उत्तर धु्वाच्या तीस अंश जवळून जातो. याची जास्तीत जास्त रुंदी अंदाजे पंचेचाळीस अंश तर कमीत कमी पाच अंश आहे. आकाशगंगा धनू व वृषभ ह्या समुहात क्रांतिवृत्ताला (सूर्याच्या वार्षिक भासमान गतीच्या मार्गाला) साठ अंश छेदते. खगोलीय विषुववृत्ताला गरूड व शुंगाध या समूहात सुमारे बासष्ट अंशांत छेदते. आकाशगंगेच्या दक्षिण भागात जास्त तारे आहेत.

 

पृथ्वीसह अनेक ग्रह-उपग्रह, बहुग्रह आणि मंगळ व गुरू ह्यांच्यामधील असंख्य लहानमोठे खडक ह्यांनी सूर्यकुल बनले आहे. सूर्यासारख्या असंख्य ता-यांचा समूह म्हणजे आकाशगंगा होय. आकाशगंगेप्रमाणे अनेक समूह आकाशात आहेत, त्यांना दीर्घिका म्हणतात.
 

आकाशगंगेत सुमारे शंभर अब्ज तारे असावेत असा अंदाज व्यक्त केला जातो. या तार्‍यांखेरीज अभ्रिका, रूपविकारी तारे, तारकायुग्मे, तारकागुच्छ वगैरे निरनिराळे घटक आहेत. आकाशगंगेच्या पट्ट्यात त्या सर्वांची फार दाटी झाल्यामुळे व त्यांच्या प्रकाशामुळे आकाशात एक दुधाळ पट्टा दिसतो.

 

एका निराशावादी लेखकाचं स्वगत


jayant_pawar        एकविसाव्या शतकाच्या तिठ्यावर उभा राहून आज मी मागे-पुढे बघतो तेव्हा दुभंग दिसतो. माझ्यात आणि भवतालातही. नव्वदोत्तरी संवेदनशीलता नावाचा प्रकार साहित्यात जमेस धरला जाऊ लागला, तेव्हा त्या धुमाळीत लिहिणा-यांपैकी मी एक होतो. स्वतःचं असं काही गवसलंय, असं वाटावं अशी स्थिती नव्वदीच्या दशकातच प्राप्त झाली. त्याआधीच्या माझ्या नसणा-या अवकाशाबद्दल उसनं अवसान आणून लिहिताना येणारं रितेपण जाणवेनासं झालं. असं काय घडलं होतं आसपास, ज्याने ही ‘स्व’ची जाणीव घट्ट केली, असा मी विचार करतो तेव्हा माझ्या सांस्कृतिक भवतालावर होणारं आक्रमण दिसतं. नव्वदीच्या थोडा आधीचा काळ मुंबईतल्या गिरणगांवाच्या पडझडीचा. तिथली माणसं परागंदा होण्याचा वा दिशाहीन भरकटण्याचा. त्याच्या हक्काच्या जमिनीवरचं त्याचं स्वामित्व हिरावलं जाण्याचा. याच काळात राष्ट्रीय परिघावर बहुजनजाणीव उगवू लागली होती. तिचा बाह्यरंग राजकीय असला तरी त्याची पुटं सामाजिक धारणांमध्ये खोल झिरपत अनेकांच्या (सर्वांच्या नव्हे) नेणिवेपर्यंत गेली. हा नव्या अस्मितांचा आणि प्रतिअस्मितांचा उगवाईचा काळ होता. यात मला कसलं तरी भान आलं. ते नेमकं कसलं, हे सांगता येणार नाही, पण माझ्या पायाखालची माती कुठली आहे आणि तिच्याशी माझं काय नातं आहे, हे मला कळलं. साक्षात्कारासारखा तो उजेड होता. त्या उजेडात काही वाटा मला लख्ख दिसू लागल्या.

अहिराणी – खानदेशची मध्यवर्ती बोली


महाराष्ट्राच्या धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांत बोलली जाणारी ‘अहिराणी’ ही एक भारतीय आदिम बोली. तिच्‍या थोड्या वेगळ्या स्‍वरूपाला ‘खानदेशी’ असे म्हणतात. मराठीची पोटभाषा म्हणून समजली जाणारी ही बोली सर ग्रिअर्सन संपादीत ‘लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया’च्या नवव्या खंडाच्या तिस-या भागात अहिराणीचा उल्‍लेख आला असून त्‍यांनी या भाषेचा भिल्‍लांची भाषा म्‍हणून उल्‍लेख केला आहे.

ठाण्यातील वैचारिक चर्चेचे दालन – डॉ. राममनोहर लोहिया व्याख्यानमाला

प्रतिनिधी 14/01/2012

- संजीव साने

ठाण्यातील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक विश्वात स्वत:चं स्थान निर्माण करणारी डॉ. राममनोहर लोहिया व्याख्यानमाला वैशिष्ट्यपूर्ण आहे. गेल्‍या सत्तावीस वर्षांपासून ही व्‍याख्‍यानमाला आयोजित करण्‍यात येत आहे. दरवर्षी आठ ते नऊ दिवस चालणा-या या व्‍याख्‍यानमालेत व्याख्यानं, टॉक शो, मुलाखत अशा स्वरूपाचे कार्यक्रम या निमित्ताने आयोजित केले जातात. ‘सामान्‍य लोकांकडून सामान्‍य लोकांसाठी चालवण्‍यात आलेली व्‍याख्‍यानमाला’ हे या उपक्रमाचे वैशिष्‍ट्य ठरते. व्‍याख्‍यानमालेचे आयोजक संजीव साने यांच्‍याकडून या व्‍याख्‍यानमालेच्‍या प्रवासावर टाकण्‍यात आलेला हा प्रकाशझोत...

- संजीव साने

अहिराणी बोली – सामाजिक अनुबंध


महाराष्ट्राच्या धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांत बोलली जाणारी ‘अहिराणी’ ही एक भारतीय आदिम बोली. तिच्‍या थोड्या वेगळ्या स्‍वरूपाला ‘खानदेशी’ असे म्हणतात. मराठीची पोटभाषा म्हणून समजली जाणारी ही बोली सर ग्रिअर्सन संपादीत ‘लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया’च्या नवव्या खंडाच्या तिस-या भागात अहिराणीचा उल्‍लेख आला असून त्‍यांनी या भाषेचा भिल्‍लांची भाषा म्‍हणून उल्‍लेख केला आहे.

दि पायोनियर- लाईफ अँड टाईम्स ऑफ विठ्ठलराव विखे पाटील

प्रतिनिधी 10/01/2012

मराठीतील प्रसिद्ध लेखक व पत्रकार अरूण साधू यांच्‍यासाठी तो दिवस अत्‍यंत मोलाचा होता. सहकारी साखर उद्योगाचा पाया घालणा-या सहकार महर्षी कै. विठ्ठलराव विखे पाटील यांच्यावर अरूण साधू यांनी लिहीलेल्‍या ‘दि पायोनियर- लाईफ अँड टाईम्स ऑफ विठ्ठलराव विखे पाटील’ या दिर्घ इंग्रजी चरित्र ग्रंथाचा प्रकाशनसोहळा नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्‍टेकसिंग अहलुवालिया यांच्‍या हस्‍ते दिल्‍लीत पार पडत होता. या पुस्‍तकाचे प्रकाशन ‘रोहन प्रकाशन’ या मराठी संस्‍थेकडून करण्‍यात आले आहे. रोहन प्रकाशनने इंग्रजी प्रकाशन क्षेत्रात नुकतेच पाऊल ठेवले असून अरूण साधू लिखित हे पुस्‍तक प्रकाशित होणे हा त्‍यांच्‍यासाठीही तेवढाच महत्‍त्‍वाचा क्षण होता.
 

‘जन गण मन’चे शतक

प्रतिनिधी 16/12/2011

‘जन गण मन’ या राष्ट्रगीताचे 2011 हे शतक महोत्सवी वर्ष! या गीताला शंभर वर्षे पूर्ण झाली. घटना समितीच्या निर्णयानुसार 24 जानेवारी 1950पासून ‘जन गण मन’ हे स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता पावले. जगाच्या कानाकोपर्‍यातील भारतीय व्यक्ती तिथली भाषा न जाणता केवळ तिरंगा आणि राष्ट्रगीताची धून ऐकून आपल्या देशाच्या ठिकाणी मनाने पोचतो.
 

स्वस्तिक - भारतीय संस्कृतीचे मंगल प्रतीक


स्वस्तिक हा शब्द सु+अस धातूपासून बनला आहे. सु=शुभ, मंगल व कल्याणप्रद आणि अस=सत्ता, अस्तित्व. म्हणून स्वस्ति= कल्याणाची सत्ता. कल्याण असो किंवा आहेच ही भावना. स्वस्तिक हे प्रसन्नतेचेही द्योतक आहे आणि म्हणूनच प्राचीन काळापासून भारतीयांनी सर्वश्रेष्ठ प्रतीक मानून त्याचा जीवनाच्या विविध अंगांत प्रयोग केला आहे.

स्वस्तिक हे भारतीय परंपरेत चतुर्विध पुरुषार्थाचेही सूचक मानले आहे. चारही युगांत स्वस्तिक चिन्ह अक्षुण्ण राहते अशी भारतीयांची श्रद्धा आहे.

स्वस्तिकाचा प्रचार भारतातच नव्हे, तर जगभरच्या बहुतेक देशांत आढळतो. सर्वांत प्राचीन अशा पाषाणयुगापासून स्वस्तिकाचा प्रयोग दृष्टीस पडतो. विदेशांत उत्खननांतून बाहेर काढलेल्या कित्येक वस्तूंवर स्वस्तिक चिन्ह आढळते. मोहेंजोदडोच्या उत्खननातही ते सापडले आहे.

श्यामची आई आणि आजची मुले

प्रतिनिधी 14/12/2011

साने गुरुजीचे ‘श्यामची आई’ हे पुस्तक म्हणजे मातृप्रेमाचे महान्मंगल स्तोत्र आहे असे आचार्य अत्रे यांनी म्हटले आहे. श्याम या शाळकरी मुलाच्या भूमिकेतून छोट्या कथा अन् प्रसंग साने गुरुजींनी लिहिले. एका छोट्या गावात संध्याकाळी श्याम आपल्या मित्रांना आपल्या आईविषयीच्या कथा सांगतो, अशी सर्व प्रसंगाची रचना आहे. कोमल हृदयाचा, भाबडा मुलगा आपल्या आईविषयी सांगतो तेव्हा त्याचा कंठ भरून येतो, डोळ्यांत अश्रू दाटतात व ऐकणार्‍या मुलांचीही तशीच स्थिती होते.
 

आज साठीच्या वयात असलेल्यांनी साने गुरुजींना पाहिले आहे, ऐकले आहे. ना.ग.गोरे, एस. एम.जोशी, प्रकाशभाई मोहाडीकर, वसंत बापट, निळू फुले व सेवादलातील सर्वच जण साने गुरुजींची वेडी मुले होती, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही सारी उदात्त तत्त्वे गुरुजींच्या आचरणातून, कथांतून त्या पिढीत उतरली. ती सर्व मंडळी स्वातंत्र्याच्या चळवळीत तर होतीच; शिवाय शिक्षण, कला, साहित्य, समाजकारणात यशस्वी ठरली. मात्र ती सर्वजण साने गुरुजींची ‘मुले’च होती.
 

आचार्य अत्रे यांनी ‘श्यामची आई’ चित्रपट काढला व त्यास चित्रपटक्षेत्रातील सर्वोच्च बहुमान अर्थात सुवर्ण कमल मिळाले.

‘ग्रंथाली वाचक दिना’निमित्त या वर्षी ‘श्यामची आई’ हेच सूत्र घेतले आहे!