विनय सहस्रबुद्धे - प्रशिक्षण-प्रबोधन-संशोधन
- ज्योती शेट्ये
प्रशिक्षण-प्रबोधन-संशोधन
‘आत्म दीपो भव’ म्हणत स्वत:च्या अंतरंगात उजळलेल्या प्रकाशात वाटचाल करण्याचे ज्ञान देण्याचा प्रयत्न करणार्या, प्रशिक्षण-प्रबोधन-संशोधन ही कार्याची त्रिसूत्री असणार्या आणि दक्षिण आशिया खंडात अशी एकमेव संस्था असल्याचा दावा सांगणार्या ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ मध्ये विनय सहस्रबुद्धे ह्यांचा प्रवेश
८ फेब्रुवारी १९८८ ह्या दिवशी झाला. तिथून त्यांनी उड्डाण केले, ते आज भारताच्या राष्ट्रीय वर्तुळात वावरत आहेत. एनडीटीव्ही सह वेगवेगळ्या वाहिन्यांवरील पंडितांच्या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चर्चा-परिषदा यांत ठाम मते मांडत आहेत. तत्सबंधी लेखन करत आहेत. अर्थात त्यांचा म्हाळगी प्रबोधिनीपर्यंतचा प्रवासदेखील सर्वसामान्य नाही, तो कष्टाचा आहे, नियोजनपूर्वक आहे.