बाळ भैरवनाथाचा हवामानाचा अंदाज!
बाळ भैरवनाथांचे देवस्थान अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे आहे. तो अष्ट भैरवनाथांपैकी एक. त्या ठिकाणी गुढीपाडव्यानंतर पंधरा दिवसांनी दोन दिवस यात्रा भरते. यात्रेत बाळ भैरवनाथ व जोगेश्वरी यांचे लग्न यथासांग होते. बाळभैरवनाथांच्या त्या देवस्थानाचे एक वैशिष्ट्य आहे. गावच्या परंपरेनुसार गुढीपाडव्याला तेथील ग्रामस्थ एका विशिष्ट पद्धतीने येणाऱ्या हवामानाचा-पाऊसपाण्याचा अंदाज बांधतात. त्याला एक वेगळेच पंचांगवाचन म्हणता येईल.