पुणे येथे 1977 साली झालेल्या बावन्नाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते पुरुषोत्तम भास्कर भावे. त्यांचा जन्म 12 एप्रिल 1910 रोजी धुळे येथे झाला. भावे हे मराठी नवकथेचे एक जनक मानले जातात. त्यांच्या नावावर सतरा कादंबऱ्या, सव्वीस कथासंग्रह, बारा लेखसंग्रह, आठ नाटके असे साहित्य आहे. त्यांनी इतर साहित्यिक कृतीही लिहिल्या व त्या एकूण साहित्यातून मराठी साहित्य समृद्ध केले आहे. भावे यांना संपन्न घराण्यात जन्मास येऊनही जीवनातील खडतर अनुभव घ्यावे लागले. भावे यांचे संस्कारक्षम बालपण विदर्भात गेले...