हस्ताक्षर ही माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख असते. ज्या व्यक्तीचे हस्ताक्षर सुंदर त्याच्याकडे यश, सन्मान आणि समृद्धी चालत येते अशा दृढ भावनेने लेखक व पत्रकार किशोर...
जळगावचे यजुर्वेंद्र महाजन यांच्या कार्याचा मूळ गाभा ग्रामीण भागातील गरीब, अंध आणि अपंग विद्यार्थ्यांकडून स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणे हा आहे. त्यातून त्यांनी अनेक प्रकल्पांना चालना दिली आहे. त्यांपैकी मनाला स्पर्श करणारे काम आहे ते अंध-अपंगांना तशा परीक्षांसाठी तयारी करून घेण्याचे. त्याकरता भारतातील विद्यार्थी त्यांच्याकडे येतात व त्यांना विनामूल्य शिक्षण दिले जाते...
उद्योगपती कै. भवरलाल जैन यांच्या संकल्पनेतून ‘अनुभूती निवासी शाळा’ निर्माण झाली. शाळेने २०१७ मध्ये दहा वर्षें पूर्ण केली. ‘पुस्तकी ज्ञानाला अनुभवाची जोड देऊन विद्यार्थी...
सतीश पाटील यांचा जन्म नाशिकचा, पण त्यांचे पालनपोषण जळगाव येथे झाले. आईवडील शिक्षक. त्यामुळे घरात शिस्तीचे वातावरण. अभ्यासाला आणि इतर कलागुणांना पोषक असे. त्यांच्याजवळ...
कनाशी हे खानदेशातील दोन हजार लोकवस्तीचे, महानुभव पंथाचे छोटेसे गाव. महानुभव पंथाची उपासनापद्धत आणि शिकवण यांचे तेथे प्राबल्य असल्यामुळे शेकडो वर्षांपासून तेथे मांसाहारावर अघोषित...
‘चूल’ ग्रामसंस्कृतीतील महत्त्वाचा घटक आहे. चुलीला प्राचीन इतिहास आहे; मानवाला अन्न शिजवून खाण्याची सवय लागली ती चुलीमुळे तीन दगडाची, मातीची, सिमेंटची, पत्र्याची, विद्युत अशा...
रंगगंध कलासक्त न्यासाच्या पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती अखिल भारतीय साहित्य अभिवाचन महोत्सवास २०१२ मध्ये दहा वर्षे पूर्ण झाली.
‘रंगगंध’च्या साहित्य अभिवाचन महोत्सवाबद्दल बोलताना, जर ‘स्पर्धेतील संघ...
श्रद्धेपायी केवढा खटाटोप!
रात्रीची जेवणे सुरू होती. भावाच्या दोन नातवंडांमध्ये मारामारी झाली. पुतणीचा मुलगा अमोल आणि पुतण्याचा मुलगा विवेक. कारण काय, तर विवेकने अमोलची...
जळगावातल्या भडगाव तालुक्यातलं कोळगाव हे माझं गाव. लहानपणी गावात पाळली जाणारी बैलगाडं गावाबाहेर नेण्याची प्रथा मी पाहिली आहे. कित्येक वर्षांपासून चालू असलेली ही प्रथा गावातल्या एका वजनदार माणसाच्या सोयीसाठी अचानक मोडली गेली. पोळ्याला कोणी कोणता बैल धरायचा यावरून आम्हा भावंडांमध्ये भांडणं होत. सर्वांना आधी पळणार्या बैलाला धरायला आवडे. कोणी म्हातार्या बैलाला धरायला तयार नसे. कोण कोणता बैल धरणार हे ठरल्यावर जो तो आपापल्या बैलाकडे अधिक लक्ष देई. जो तो सालदारांनी कापून आणलेलं हिरवंगार लुसलुशीत गवत आपल्याच बैलांना अधिक टाके...