Tag: सतपाळ
साहित्याचे अभ्यासक फादर फ्रान्सिस कोरिया (Father Francis Correa)
मोन्सेनियर फादर फ्रान्सिस कोरिया हे धर्मगुरू म्हणून वसईत गेल्या बावन्न वर्षांपासून आहेत. त्यांना धर्मगुरू म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मॉन्सेनिअर हा ‘किताब’ मिळाला आहे. म्हणून ते त्यांच्या नावापुढे मोन्सी असे लिहितात. तो कोणाही धर्मगुरूसाठी मोठा बहुमान आहे! मॉन्सेनियर कोरिया हे धर्मगुरू असले तरी त्यांची ओळख लेखक म्हणून आहे. त्यांनी आजवर बत्तीस पुस्तके लिहिली आहेत. ‘सामवेदी ख्रिस्ती समाज’, ‘मधाच्या घागरी’; तसेच, त्यांनी वसई किल्ल्यांतून नेलेल्या व आता हिंदू तीर्थक्षेत्री असलेल्या अडतीस घंटांचा शोध नऊ जिल्ह्यांत जाऊन लावला. त्यावरही त्यांनी पुस्तक लिहिले आहे...