Home Tags वृद्ध

Tag: वृद्ध

_niradhar_vruddhanche_dr_maybaap_2_0.jpg

निराधार वृद्धांचे डॉक्टर मायबाप

भीक मागत फिरणारे आयुष्याच्या उतारवयातील आजी-आजोबा रस्त्यावर कोठेकोठे दिसतात. कधी जोडीने किंवा कधी एकेकटे. ती म्हातारी मंडळी त्यांचे म्हातारपण कोणाच्या तरी शिळ्यापाक्या अन्नावर किंवा किरकोळ पैशांच्या भिकेवर कंठत असतात- रस्त्यावर. फूटपाथवरील त्या जगण्यात त्यांना कधी कुत्री, उंदीर, घुशी चावतात, तर कधी त्यांचे अपघात होतात. उतारवयामुळे कधी डोळ्यांची दृष्टी अधू होते तर कधी मोतिबिंदू होऊन डोळे पूर्ण जातात. जेथे मुळात अन्नपाण्याचीच सोय नाही तेथे जखमांच्या दुरूस्तीसाठी पैसा कोठून आणणार? अभिजित आणि मनीषा सोनवणे हे दाम्पत्य तशा आजीआजोबांसाठीच काम करते...