Tag: रमेश पाटणकर
मनुष्यजीवनाला आकार देणारा संस्कार – मौंजिबंधन
पुण्याचे पाटणकर यांच्या कंपनीने मुंजीचा ‘इव्हेंट’ साजरा करण्याची योजना आखून तसे समारंभ घडवण्यास सुरुवात केली आहे. इच्छुक देशीविदेशी पालक त्या योजनेचा लाभ घेत आहेत. पुण्याच्या सकाळ वृत्तपत्र समूहानेदेखील सर्व जातिधर्मांसाठी मुंजविधी करण्याची चळवळ जाहीर केली आहे. पाटणकर कंपनीने ‘व्रतबंध- एक विद्याव्रत’ या नावाचे प्रदर्शन पुण्यात दोन वर्षांपूर्वी योजले होते. त्याचे उद्घाटन अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे यांच्या हस्ते झाले होते. त्यांनी त्यांच्या उद्घाटनपर भाषणात ठासून हेच सांगितले, की मुंज हा विधी धार्मिक व काही जातींपुरता मर्यादित नाही. तो सर्व मुलांसाठी संस्कार म्हणून आवश्यक आहे. शिवाजीराजांचा मुंजविधी काय परिस्थितीत केला गेला त्याचेही वर्णन लेखात आहे...