Tag: महोली नागी
अमेरिका – स्थलांतरितांचा देश (America, The Migration Story)
पृथ्वीतलावरील अनेक देशांतील लोक 1840 सालापासून अमेरिकेच्या भूमीवर येऊन थडकत आहेत. कॅलिफोर्निया या अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील राज्यात सोने सापडल्याची बातमी 1848 च्या सुमारास जगभर पसरली. त्यामुळे सोन्याच्या मोहाने त्यावेळी तीन लाखांपेक्षा जास्त लोक अमेरिकेत येऊन ठेपले. त्या विषयी एक सिनेमाही विसाव्या शतकाच्या मध्यावर निघाला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युरोपातील अनेकांना त्यांचे त्यांचे देश सोडून पळावे लागले होते. अनेक देशांतील प्रतिभावान आणि मेहेनती तरुण त्या काळात अमेरिकेत दाखल झाल्याने अमेरिका श्रीमंत होण्यास मदत झाली ! किंबहुना तेव्हापासूनच अमेरिकेची धारणा अशी बनत गेली, की जगातील हुशार लोकांनी अमेरिकेत यावे ! आणि त्यांच्या बुद्धिप्रतिभेला व कार्यशक्तीला तेथे वाव होताही...