Home Tags मंजिरी निंबकर

Tag: मंजिरी निंबकर

भाषादूत मॅक्सिन बर्नसन

2
मॅक्सिन बर्नसन या मूळ अमेरिकन रहिवासी. त्या मॅक्सिनमावशी म्हणून सातारा जिल्ह्याच्या फलटण परिसरात माहीत आहेत. त्यांनी तेथील लहान मुलांना शिकवले. नंतर प्रौढपणी, त्या ‘टीआयएसएस’च्या हैदराबाद शाखेत प्राध्यापक या नात्याने भाषाविषयक कौशल्ये शिकवत आहेत. त्या त्यांची मायभूमी अमेरिका सोडून कायमच्या भारतात आल्या आणि त्यांना मराठी भाषेचे प्रेम लागले. त्यांनी मराठीकरता मोठे कार्य करून ठेवले आहे...

फलटणचा संस्कृतिशोध !

0
फलटण तालुका संस्कृती महोत्सवात स्थानिक परिसरातील मुद्यांना स्पर्श करणाऱ्या बौद्धिक व अनुभवाधारित चर्चा चालू असताना, दुसऱ्या बाजूला वातावरण जत्रेचे, हलकेफुलके होते. माहोल अनौपचारिक गप्पांचा होता. येणारे पाहुणे आणि श्रोतेही प्रदर्शनातील मोजक्याच स्टॉलना भेटी देऊन विविध माहिती गोळा करत होते. आकर्षणे वेगवेगळी होती. त्यात फलटणचा दुष्काळी टापू जलमय कसा झाला येथपासून शहराच्या समस्यांची विद्यार्थ्यांनी मांडणी केली होती, बचतगटाच्या महिलांनी उभे केलेले जग होते, फलटण तालुक्यातील लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक कार्यालयाने पुरवलेली मताधिकाराची विविध तऱ्हेची माहिती होती...

फलटण तालुका संस्कृती महोत्सव

‘फलटण तालुका संस्कृती महोत्सव’ नावाचा आगळावेगळा ‘इव्हेंट’ संक्रांतीचा मुहूर्त साधून सोमवारी-मंगळवारी (16-17 जानेवारी) फलटणच्या ‘महाराजा मंगल कार्यालया’त साजरा होत आहे. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’...

कृषिसंशोधक शेळीतज्ज्ञ बनबिहारी निंबकर

0
बनबिहारी विष्णू निंबकर यांनी शेळ्या व मेंढ्या यांचा सूक्ष्म स्तरावर जातीनिहाय शास्त्रीय अभ्यास केला. त्यांच्या त्या अभ्यास व संशोधन कार्यामुळे शेळी-मेंढीपालन करणारे लोक यांची उन्नती साधली गेली व त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेल्या योजना, उत्पादने आणि ती तयार करण्यातील त्यांची कल्पकता पाहून तत्कालीन महाराष्ट्र सरकारने त्यांना सहा वर्षांसाठी ‘मॅफ्को’चे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. त्या वेळी मॅफ्को तोट्यात होती. निंबकर यांच्या अभिनव कल्पनांमुळे ते मॅफ्कोतून निवृत्त झाले तेव्हा ती नफादायक सरकारी कंपनी झाली होती...