Tag: बाबा फाटक
देगावच्या विवेकवादी समाजसेविका: स्मिता जोशी
स्मिता जोशी या सर्वसामान्य शिक्षिकेने तळागाळातील वंचित आदिवासी समाजासाठी अठ्ठावीस वर्षे सातत्याने काम केले, ही त्यांची ओळख. त्यांनी 15 ऑगस्ट 1981 रोजी कर्जतजवळील कोंदिवडे या गावी ‘बांधिलकी’ ही सेवाभावी संस्था स्थापन केली. त्यांनी ‘बांधिलकी’चे काम स्त्रीला शिक्षित करणे, तिचे वैचारिक प्रबोधन करणे व तिला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे या त्रिसूत्रीवर उभे केले, स्थिर केले व फुलवले...
देगावच्या वहिनी – इंदिराबाई गोंधळेकर (Indira Gondhlekar – Progressive Lady from Degav)
देगाव गावाचा आदर्श; आरोग्याचा, बुद्धिमत्तेचा, सुधारक, पुरोगामी विचारांचा ‘आयकॉन’ म्हणजे इंदिराबाई गोंधळेकर तथा वहिनी. त्यांच्या वयाच्या अवघ्या छत्तिसाव्या वर्षी पतीचे अकस्मात निधन झाले. त्यानंतर सर्व कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. इंदिराबार्इंनी प्रापंचिक जबाबदाऱ्या निभावताना कर्तव्य हीच देवपूजा, माणुसकी हाच धर्म ही मूल्ये आयुष्यभर जपली...
नरकतीर्थ बाबा फाटक
खादीची गोल गांधी टोपी, खादीची अर्धी विजार व खादीचा अर्ध्या बाह्यांचा शर्ट असा पेहराव,कामात सतत गर्क असणारे तरी हसरा चेहरा,वापरायला जुनी सायकल असे व्यक्तिमत्व म्हणजे बाबा फाटक.अशा नरकतीर्थ बाबांना १९७२ साली भारत सरकारने ताम्रपट व सन्मानपत्र देऊन गौरविले ...
आल्फ्रेड गॅडने आणि त्यांचे दापोलीतील एकशेसदतीस वर्षांचे ए.जी. हायस्कूल
अल्फ्रेड गॅडने हे दापोलीला मिशनरी म्हणून 1875-76 साली आलेली स्कॉटिश व्यक्ती. त्यांनी शिक्षण क्षेत्रात बहुमोल योगदान दिले. त्यांनी कोकणातील पहिल्या हायस्कूलची स्थापना दापोली येथे ए.जी. हायस्कूलच्या रूपात 1880 मध्ये केली. गॅडने यांनी प्राचार्य म्हणून जवळजवळ अठ्ठेचाळीस वर्षे ए.जी. हायस्कूलचे प्राचार्यपद सांभाळले. गॅडने अनाथ मुलांचेही वाली झाले…