Home Tags पालघर

Tag: पालघर

वसईचा भुईकोट किल्ला – पोर्तुगीज वैभव (Fort of Vasai – Portuguese heritage)

वसई हे ऐतिहासिक शहर आहे. ते पाचशे वर्षांत पाच वेगवेगळ्या राज्यकर्त्यांच्या आधिपत्याखालून गेले. गुजरातच्या बहादुरशाहचा अंमल, नंतर दोनशे वर्षांचे पोर्तुगीज राज्य, नंतर मराठ्यांचे आधिपत्य; इंग्रज 1802 साली तेथे...

सुनंदाताई पटवर्धन – एक प्रेरणास्थान

1
सुनंदाताई पटवर्धन यांच्या दुःखद निधनाची (10 जानेवारी 2024) बातमी वाचली आणि हृदयाचा एक ठोका चुकला. सुनंदाताई आणि माझा संपर्क पंधरा वर्षांहून अधिक काळचा. मी रोटरी क्लब ऑफ ठाणे सबर्बन आणि प्रभाकर फाऊंडेशन यांचा प्रतिनिधी म्हणून 2007 च्या सुमारास सुनंदाताई आणि त्यांच्या ‘प्रगती प्रतिष्ठान’ संस्थेच्या संपर्कात आलो. सुरुवातीला जव्हार-मोखाडे भागात आदिवासी मुलांना सायकल वाटप, महिलांना घरघंटी वाटप अशा उपक्रमांतून सुनंदाताई यांच्याबरोबर कामाला सुरुवात केली...

पाखरा – जव्हार पाड्याच्या मुलांचे पुस्तक !

पालघर जिल्ह्याच्या जव्हार पाडा भागातील मुलांनी पक्ष्यांविषयी लिहिले, त्यांना दिसणाऱ्या पक्ष्यांविषयी तेच ‘पाखरां’ नावाच्या पुस्तकात छापले गेले आहे. त्यांची निरीक्षणे संशोधनातून मांडलेल्या पक्षीपुस्तकापेक्षा कमी नाहीत...

विराट विरार

विरार या एकेकाळी लहानशा असलेल्या गावाचे विराट नगरीत रूपांतर झाले आहे. हा लेख साधारणत: पाऊणशे वर्षांपूर्वीच्या विरारच्या गतस्मृतींमध्ये वाचकाला रमवतो. त्यावेळचे गावपण, परस्परांविषयीचा आपलेपणा व माणुसकीचा गहिवर, संस्कृतीच्या पाऊलखुणा झरझर डोळ्यांसमोरून तरळून जातात. भेदभावरहित अशी ती गावे शिक्षणाच्या विस्फोटाने, शहराच्या बंदिस्त जीवनशैलीने, आधुनिक सुविधा आणि श्रीमंतीने हरवून गेली आहेत...

माझी वाडवळी बोली (Wadwali dialect)

वाडवळ ज्या बोलीतून त्यांचा व्यवहार करतात त्या बोलीला ‘वाडवळी’ म्हटले जाते. वाडवळी ही माझी प्रथम भाषा आहे. प्रमाण मराठी ही माझ्या आयुष्यात वाडवळीनंतर आलेली दुसरी भाषा होय. वाडवळी बोलीची गुणकीर्ती गाताना मला एकेका शब्दामागे अनेक शब्दांचे सर सहज सुचत राहतात ....

स्थलांतरित मुलांचे शिक्षण – दौंडचा अनुभव (Education of Migrant Children -Daund’s Experience)

शालेय मुलांचे ऑनलाईन शिक्षण लॉकडाऊनमुळे 2020 मध्ये सुरू झाले, परंतु स्थलांतरित मुलांच्या शिक्षणाची मोठी अडचण निर्माण झाली. तशा मुलांच्या अनेक झोपड्या नांदूर गावात कोरोनाच्या सर्वेक्षणाच्या निमित्ताने जुलै 2020 महिन्यात दिसून आल्या. परंतु ऊसतोडीला पालकांबरोबर दिवसभर गेलेली ती मुले संध्याकाळीच माघारी येत. त्यांचे सर्वेक्षण करणे कठीण होते...

नेहरोलीच्या होळीत लापसुटीची मजा (Nehroli Village in Palghar dist in Gavgatha)

नेहरोली हे गाव पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील दक्षिण सीमेवर वसलेले आहे. ते पालघर जिल्ह्याच्या ठिकाणापासून साधारण साठ किलोमीटरवर येते. गाव आहे निसर्गरम्य, परंतु औद्योगिकीकरण आणि दळणवळणाच्या सोयी यांमुळे गावाचा विकासही साधला गेला आहे.

वसईची सुकेळी अस्तंगत? (Sukeli – Vasai’s Speciality is Vanishing)

वसईची सुकेळी हा एके काळी आकर्षणाचा बिंदू होता. वसई हे पालघर जिल्ह्यातील मुंबई शहराजवळचे जुने गाव. वसईत भातशेतीच्या जोडीला फुलांच्या आणि केळीच्या बागा होत्या. वसईवर त्या काळी हिरव्यागर्द केळींचे अधिराज्य होते;

बाबू मोरे : शाळेकडून गाव समृद्धीकडे (Babu More – School teacher aspires for Village...

बाबू चांगदेव मोरे हे पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यातील खोमारपाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. बाबू मोरे यांनी ऑर्गेनिक शेतीचा प्रयोग उन्हाळ्याच्या दिवसांत ठिबक सिंचनाद्वारे विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळेच्या प्रांगणात यशस्वी करून दाखवला.

रमेश पानसे यांचे स्वप्न आणि शैक्षणिक धोरणाचे सत्य (Panase’s Dream Came True Through Educational...

प्रा. रमेश पानसे ही व्यक्ती नसून स्वतःच एक संस्था आहेत! प्रचंड ऊर्जा, उर्मी, अभ्यास, तळमळ, लोकसंग्रह, कल्पना, उत्साह हे सर्व त्या व्यक्तीजवळ आहे. बालशिक्षणात त्यांचे योगदान प्रचंड आहे. त्यांना शिक्षणऋषीच म्हणता येईल. त्यांनी 2020 साली ऐंशीव्या वर्षात पदार्पण केले आहे...