नंदकुमार आणि नंदिनी पाटील हे मुंबईतील परळचे हरहुन्नरी जोडपे. पैकी नंदकुमार हा पत्रकार – छायाचित्रकार – वर्तमानपत्रात मजकुराची मांडणी आकर्षक करू शकणारा. त्याखेरीज त्याचे इव्हेण्ट मॅनेजमेंट वगैरेंसारखे अनंत उद्योग आणि त्या साऱ्यात नंदिनीची शंभर टक्के साथ. त्याच्या वृत्तीत परोपकार व सेवाभाव घरच्या संस्कारातून मुरले गेले आहेत. त्यामुळे त्याने उद्योग-व्यवसाय म्हणून काही केले तरी ते गुण प्रतीत होतातच. तशाच भावनेतून ती दोघे मिळून पतीपत्नी ‘कलाश्रम’ नावाची संस्था चालवतात आणि 2018 सालापासून दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ‘दखलपत्रे’ देण्याचा कार्यक्रम करतात...